संपादकीय विशेष. – संभाजी जाधव.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि निरपेक्ष जीवन जगणारे म्हणून ज्या व्यक्तिचा उल्लेख केला जाऊ शकतो ते एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० साठी भारताच्या तरूणांचे स्वप्न पाहिले होते. आणि २०२० मध्ये भारत तरुणांचा देश असेल असे भाकीत केले होते.
माजी राष्ट्रपती आणि जेष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम एक दूरदृष्टी असलेले नेते होते. जात- पात – धर्मांच्या वर उठून जीवन जगणार्या एपीजेना राष्ट्रपती पदाचाही मोह किंवा गर्व झाला नाही.
निरपेक्ष जीवन जगणारा एक अवलीया संत म्हणून देखील त्यांचा उल्लेख करता येवू शकतो.
अशा या आशावादी नेत्याने भारतातील तरुणांसदर्भात एक स्वप्न पाहिले होते. येणार्या येणार्या काळात भारत हा जगातील सर्वात तरुण देश असेल.
आणि २०२० मध्ये भारत हा जगातील तरुण देश समृध्द देश म्हणून गणला जाईल.
परंतू असे घडले नाही.
याची अनेक कारणे सांगता येतील.
आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस देशभर युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
१९८४ मध्ये भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषीत केला आणि १९९५ पासून दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा होवू लागला.
आज स्वामी विवेकानंदाची १५९ जयंती आहे.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने देशाचे प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
त्याच सोबत “मेरेेे सपनो का भारत” या विषयावरील निवडक निंबधाचे प्रकाशन देखील करणार आहेत.
प्रश्न असा आहे की भारतीय तरुणांकडून एपिजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेले स्वप्न आणि नोटबंदीच्या एका निर्णयाने संपलेली देशाची अर्थव्यवस्था त्यात कोरोनाच्या संसर्गाने देशाची बिघडलेली औद्योगिक गती, देशाचा घटलेला जीडीपी आणि संपलेला रोजगार यामुळे देशातील तरुणाई आज रोजगाराच्या शोधात अस्वस्थ आहे.
तरुण काम करायला तयार आहेत.
अहोरात्र मेहनत करण्याची त्याची मनाची तयारी आहे. वाटेल ते श्रम करण्याची त्याची तयारी असतांना त्याला पांच हजार रुपये द्यायला कुणी तयार नाही ही वस्तू स्थिती आहे.
ज्या तरुणांना रोजगार होता तो नोंटबंदीच्या चुकीच्या निर्णयाने आणि जीएसटीच्या निर्णयामुळे व्यापारावंर आलेल्या निर्बंधामुळे संपला.
कोरोना काळाने त्यात अधिक भर घातली आणि देशातील २२ कोटी तरुणांचा रोजगार संपला. तरुणांच्या व्यसनाधिन होण्याच्या कारणांमध्ये; गुन्हेगारी वाढण्याच्या कारणांमध्ये एक प्रमुख कारण सापडले ते म्हणजे बेरोजगारी.
२०१४ च्या निवडणूकीत दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन केेंद्रीय नेतृत्वाने दिले होते. आणि २०२० मध्ये तरुण भारताचे स्वप्न एपीजी कलामांनी पाहिले होते.परंतू तसे घडले नाही.
उलट कोरोना या जागतिक महामारीने देशातील तरुणांचा रोजगार देखील हिरावला आहे.
जपानसह इतर युरोपियन राष्ट्रामध्ये वृध्दांची संख्या मोठी आहे. तरुणाईच्या अभावामुळे या देशांमध्ये चितेंचे वातावरण आहे.
या उलट भारतात तरुण मंडळी मोठया संख्येने असली तरी या तरुणांच्या हातांना रोजगार नाही ही मोठी समस्या बनली आहे. हवामानतील मोठया बदलांमुळे शेती परवडेनासी झाली आहे.
त्यामुळे दहा हजार रुपयाच्या नोकरीसाठी देखील तरुण तडफडतो आहे. पंरतू सर्वत्र मंदीचे सावट असल्याने तरुणांना रोजगार नाही त्यामुळे तरुण अस्वस्थ आहे.
त्याच्या वेदना समजायला कुणीही तयार नाही. त्यामुळे निवडुकाणांमध्ये नेत्यांच्या मागे फिरणारा आणि मित्राच्या लग्नात नागीनवर नाचणार्या तरुणांच्या वेदना या पालकांना अस्वस्थ करणार्या आहेत.
मुद्रा लोन योजनेचे आमिष तरुणांना दाखविण्यात आले. परंतू बँकानी या योजनेची कशी वाट लावली याचा राज्यकर्त्यांनी शोध घ्यावा.
स्टार्टअप योजनेत कीती उद्योग लघुुउद्योग, कुटीर उद्योग उभे राहिलेत याची आकडेवारी केंद्र सरकारच्या सांख्यीकी विभागामार्फत दर तिन महिन्यांनी जाहीर होते. त्याचे विश्लेषण अगांवर काटे उभे करणारे आहे. ज्या तरुणांना रोजगार आहे, त्यांची सुरक्षित हमी नाही. हजारो कंपन्या रोजगारांना नियमबाहयपणाने राबवून घेत आहेत.
परंतू त्यांचा पीएफ, इपीएफ कापला जात नाही. त्यांच्या नोकरीची कोणतीही शाश्वती नाही. “मेक इन इंडिया”च्या नावाखाली “आत्मनिर्भर” भारताची घोषणा म्हणजे तरुणाची निव्वळ “फसवणूक” आहे. २०१४ ते २०१९ या काळात अब्जावधी रुपये खर्च करुन प्रधान मंत्र्यांनी विदेश दौरे केलेत. परंतू किती कंपन्या भारतात आल्या ? ज्यांनी भारतात उद्योग उभारुन तरुणांना रोजगार दिला ?
त्यामुळे येणार्या काळात भारतीय तरुणांना मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची कृतीशिल घोषणा आजच्या २५ व्या राष्ट्रीय युवा परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी करावी. जात – पात – धर्माच्या कृतींनी देशातील तरुणांना रोजगार मिळणार नाही. एक शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी शक्तिशाली तरुणांच्या हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला तर राष्ट्रीय एकात्मते सोबत शक्तिशाली भारत उभा राहिल.
अन्यथा जातीपातीच्या विषारी वातावरणात देशाचा बट्टयाबोळ झालेल्या दिसेल एव्हढेच.
