Homeकोंकण - ठाणेआजरा तालुक्यात अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाने होणार .- मोजणी. - दि. ....

आजरा तालुक्यात अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाने होणार .- मोजणी. – दि. . १२ जानेवारी पासून. शेतकऱ्यांनी घ्यावयाची. उपयुक्त माहिती.. पहा फक्त सह्याद्रीवर. ( तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचल्यास मोजणी करून घेण्यास सोपे. – अशी अत्यंत उपयुक्त माहिती. )

संपादकीय विशेष. – संभाजी जाधव

आजरा तालुक्यात अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाने मोजणी बुधवार दि. १२ जानेवारी पासून होणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे गावचे गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे मिळकतीचे मोजमाप व नकाशा तसेच मिळकत पत्रिका तयार करणे संबंधी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जमाबंदी आयुक्त कार्यालय व सर्वे ऑफ इंडिया डेहराडून यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात अत्याधुनिक ड्रोन द्वारे गावठाण भूमापन कार्यक्रमास सुरुवात झाली असून अत्याधुनिक ड्रोन द्वारे अचूक व जलद गतीने मोजणी काम होणार आहे दोन दारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्त्वकांक्षी व जनताभिमुख प्रकल्प असून सदर प्रकल्पाची वैशिष्ट्ये व फायदे असे आहेत कि
१) गावठाणातील सर्व मालमताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारे संरक्षण होऊन गावठाण मधील प्रत्येक घरांचा नकाशा तयार होणार आहे. २) धारकांना आपले मिळकतीचे सीमा व नेमके छत्र माहिती होणार आहे.
३) गावठाणातील धारकांना आपले मालमत्तेचे अधिकार अभिलेख पुरावा म्हणजेच मालमत्ता पत्रक ( मिळकत पत्रिका) मिळणार आहे.
४) मालमत्ता पत्रक म्हणजेच गावठाणातील घर जागेचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने त्या आधारे कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच तारण म्हणून धारकाला जमीनदार म्हणून राहता येईल.
५) विविध आवास योजनेची मंजुरी मिळणे सुरू होईल.
६) मालमत्तेची मालकी हक्क संबंधी अभिलेख व नकाशे तयार झालेले आर्थिक पत उंचावेल.
७) गावठाणातील जागेची मालकी व हत्ती संबंधी वाद तंटे मिटविण्यासाठी गावठाण भूमापन अभिलेख कायदेशीर दृष्ट्या प्रणालीत मानले जातात त्यामुळे गावात तंटे संपुष्टात येतील.
८) गावठाणातील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार मध्ये होणारी फसवणूक टाळता येईल.
९) गावठाणातील सार्वजनिक जागा रस्ते नाले यांची नकाशे व अभिलेख तयार होणार असलेले सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण होणार आहे.
गावठाण भूमापन योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण व सुपीक पेज नाहीतरी योजना यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपले मिळकतीचे सीमांकन करून घ्यावे व महसूल ग्रामविकास आणि भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी यांना योजनेचे यशस्वीरित्या होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उपअधीक्षक भूमी अभिलेख आजरा यांनी केले आहे.

चौकट.

[ गावठाण भूमापन योजने अंतर्गत ग्रामस्थांचे कर्तव्य व जबाबदारी. – गाव भेटीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. व गावठाण भूमापणाचे महत्व व फायदे कार्यपद्धतीची माहिती द्यावी, ग्रामपंचायत कडील अभिलेखामध्ये स्वतःचे मिळकती संबंधी वारस नोंदी व इतर सर्व प्रकारच्या कायदेशीर हस्तांतराचा नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात., सीमा कल का ड्रोन सर्व्हे पूर्वीचा महत्त्वाचा टप्पा आहे., जेवढे सीमांकन योग्य होईल तेवढ्या प्रमाणात कामाचा दर्जा व गति सुधारेल, सीमाकंन जितके योग्य होईल तितके त्या गावचा डिजिटल नकाशा बनवणे सोपे जाईल, गावठाण मोजणी नंतर उद्भवणारे वाद कमी होतील, ड्रोन कॅमेरा होण्यापूर्वी ड्रोन द्वारे गावठाण भूमापन आचे कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी आजच्या दिवशी मिळकतीचे आपण स्वतः योग्य ते सीमांकन करावे सिमांगणा बाबत वाद असल्यास आपापले हद्दी सीमांकन करून सदर बाबत ग्रामसेवक व मापक अथवा यशस्वी भूमापक अधिकाऱ्यांचे निदर्शनास आणावी. सार्वजनिक शासकीय व ग्रामपंचायत मिळकतीचे हळदीचे सीमांकन करण्यास सहकार्य व साहाय्य करणे सार्वजनिक मालमत्ता वर कोणी हक्क सांगत असेल तर ते कळवावे. सीमा काम करते वेळी आपले बाधित मिळकतीचे पुढील अंगण मागील खुली जागा परडे याचे एकविरेच्या सीमांकन करावे जे मिळकत धारक आपल्या मिळकतीचे सीमांकन करणार नाहीत त्यांचे सदर बाबतीत तक्रार पुन्हा ग्राह्य धरण्यात येणार नाही. असे गावठाण भूमापन योजनेअंतर्गत ग्रामस्थांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आहेत याचीही नोंद ग्रामस्थांनी घेतली पाहिजे. ]
या अत्याधुनिक ड्रोन मोजणी कामात इम्रान पाटील कनिष्ठ लिपीक उ. प. भु. अ. आजरा, शिवप्रसाद तेली प्रतिलिपी लिपीक, राधानगरी, श्री. भास्करे आजरा, अभिलेखपाल भुदरगड, अशोक खोत न. भु लिपीक आजरा, नवनाथ आमने प्रतिलिपी आजरा, निवास पाटील निमतादार आजरा, सुधीर भोसले भूकरमापक कागल, विवेक जाधव दुरुस्ती लिपिक गडहिंग्लज, श्री संकपाळ भूकरमापक भुदरगड, संतोष संकपाळ भूकरमापक भुदरगड, विवेक जाधव दुरुस्ती लिपिक गडहिंग्लज, अक्षय कोरे भूकरमापक गडहिंग्लज, व गणेश कांबळे भूकरमापक करवीर. असे अधिकारी या ड्रोन मोजणी कामात मोजणी अधिकारी म्हणून काम करणार आहेत.

क्रमशा…..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.