श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर.- शालेय समुहगीत गायन स्पर्धा. उत्साहात संपन्न.
प्रथम क्रमांक मडिलगे हायस्कूल.
आजरा.- प्रतिनिधी.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शालेय समुहगीत गायन स्पर्धा. उत्साहात पार पडली स्पर्धेच्या कै महादेव गव्हाणकर व कै. स्नेहलता ठाकूर यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सौ. जयश्री परूळेकर व मनोहर गव्हाणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
समुहगीत गायन स्पर्धेत मडिलगे हायस्कुल, मडिलगे यांनी प्रथम क्रमांक मिळविला
आजरा हायस्कुल आजरा यांनी व्दितीय तर पी एम श्री उर्दु प्राथमिक विद्यामंदिर आजरा यांनी तृतीय क्रमांक मिळवीला वाटंगी हायस्कुल वाटंगी व विद्यामंदिर यरंडोळ यांना उत्तेजनार्थ पाारितोषिके देण्यात आली या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ. नुरजहाँ सोलापूरे, बाळकृष्ण दरी व गणपतराव आयवाळे यांनी काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. पूजा पराग सामंत, पुणे व स्नेहलता ठाकूर फाऊंडेशन, उत्तूर यांचे या कार्यक्रमासाठी बहुमोल सहकार्य लाभले.

यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, अजित तोडकर, सुनिल शिंदे, निमेश देवार्डे, डॉ. कृष्णा होरांवळे, शफी नाईकवाडे, संजय पन्हाळकर, स्टीफन डिसोझा, निसार लाडजी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. संदीप देसाई, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवर यांसह संगीतप्रेमी नागरिक, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. अध्यक्ष वामन सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा सौ विद्या हरेर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
