Homeकोंकण - ठाणेड्रोन गावठाण सर्व्हे - उर्वरित गावचा व्हावा. - ग्रामस्थांची मागणी.( यापूर्वी मडिलगे...

ड्रोन गावठाण सर्व्हे – उर्वरित गावचा व्हावा. – ग्रामस्थांची मागणी.( यापूर्वी मडिलगे येथे सिटी सर्व्हे झाल्याने पहिल्या टप्प्यातील ड्रोन मोजणी मध्ये समावेश नाही. )

आजरा. प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील मडिलगे गाव येथील गावठाण सर्व्हे १९८५ साली त्यावेळच्या नियमानुसार झाला आहे. यानंतर लोकसंख्या वाढीचे व विभक्त रहाण्याचे प्रमाण यामध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार उर्वरित गाव ७० % सर्व्हेक्षण तसे होणे बाकी आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी झालेल्या सर्व्हे मधून गावठाण मध्ये स्वखर्चाने नवीन वास्तु बांधकाम करून विना कर्ज वास्तूचे काम केले आहे. तर काही ग्रामस्थांनी स्वतः स्वखर्चाने मोजणी करून सिटी सर्व्हे नोंद केली आहे. अमाप कर्ज – वास्तुची किंमत बाजार भावाने अल्प कारण उर्वरित गावठाणाचा सर्व्हे झाला नाही. अशी परिस्थिती सध्या या गावठाण मध्ये असून उर्वरित गावचा ड्रोन सर्व्हे झाल्यास संपूर्ण गावाला याचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने हाती घेतलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हे मध्ये पहिल्या टप्प्यातील मोजणीसाठी मडिलगे धरलेले नसून जुन्या गावातील गावठाणाचा सि.टी सर्व्हे नोंद झाल्यामुळे पहिल्या टप्प्यातील ड्रोन मोजणी मध्ये मडिलगे गावाचा समावेश दिसत नाही.
सध्या जुने गाव ३० % आहे. वाढीव वस्ती मधील उर्वरित गाव ७० टक्के आहे. यासाठी जागृत उर्वरित गावठाण मधील ग्रामस्थांनी आपल्या घराची गावठाण मध्ये ड्रोन द्वारे मोजणी करून घेण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.