आजरा. प्रतिनिधी. ०४
आजरा येथील वि. म. श्रृंगारवाडी शाळेला बेंटली सटिम्स पुणे वतीने ई.लर्निंग संच भेट इंजि. तुषार शिंत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ई लर्निंग चे उद्घाटन पंचायत समिती गटविकास अधिकारी बि. डी. वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष उपसरपंच शामराव हरेर होते. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष केसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेबद्दल ची माहिती दिली. व ई लर्निंग संच दिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी श्री वाघ यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेत ई लर्निंग असले पाहिजेत व ई लर्निंग बाबत ची माहिती सांगितली तसेच बेंटली सटिम्स पुणे त्यांचे आभार मानले. तर इजि. तुषार शिंत्रे यांचे अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी विलास पाटील, सुनिता चंद्रमणी, मुरलीधर कुंभार, बळवंत शिंत्रे, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अमृत कातकर, रामचंद्र कांबळे, उमा चौगुले, भारती शिंदे, सखुबाई तारळेकर, लक्ष्मी सुतार, जानू शिंत्रे महादेव जाधव, शिवाजी मांगले महादेव चौगुले, बाबासाहेब पाटील, चाळु खवरे,आप्पा पाटील , बाळु चौगुले सह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसेवक मुरलीधर कुंभार यांनी आभार मानले, सूत्रसंचालन अनिल चौगुले यांनी केले
