Homeकोंकण - ठाणेहत्ती व अन्य वन्य प्राण्यांबरोबर कसं जगायचं याबाबत पशिक्षण व्याख्यान संपन्न.

हत्ती व अन्य वन्य प्राण्यांबरोबर कसं जगायचं याबाबत पशिक्षण व्याख्यान संपन्न.

आजरा. प्रतिनिधी. ०४

आजरा येथील वन विभाग वतीने आयोजित केलेल्या हत्ती व अन्य वन्य प्राण्यांबरोबर कसं जगायचं याबाबत पशिक्षण व्याख्यान आजरा अण्णा – भाऊ सभाग्रह संपन्न झाला.
मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हा कधीतरी थांबला पाहिजे चंदगड,,आजरा, आणि गडहिंग्लज भागातील हत्तीचा व चिंतेची बाब असून हत्ती बरोबर इतर जंगली प्राण्यांचा प्राण्यांच्या बरोबर कसं जगायचं हे शिकले पाहिजे याबाबतची माहिती गजमित्र म्हणून सुप्रसिद्ध असलेले ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संस्थापक आनंद शिंदे यांनी याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रामुख्याने लोकांना हत्तीशी व इतर प्राण्यांची वागण्याचे प्रशिक्षण देणे, हत्तीचे आवडते व नावडते अन्न कोणते, शेतकरी बंधूनी शेतात व घराजवळ कोणत्या वनस्पतीची लागवड करावी, हत्तींच्या संपूर्ण कुटुंबातील माहिती, हत्तींचे मानव प्राप्त व्यवहारात वागणूक बौद्धिक क्षमता राग – प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, आपण हत्तीचा वावरत असणाऱ्या भागातून जाताना घ्यावयाची काळजी अचानकपणे समोर आलेल्या हत्तीचा हत्तीला समोर कसे जावे या बद्दल संपूर्ण माहिती व प्रशिक्षण बाबतची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण पर व्याख्यान ना मुळे हत्तीच्या बाबतीत ज्ञान वाढेल व गैरसमज दूर होऊन लोक आपल्या कुटुंबाचे व शेत पिकाचे संरक्षण करण्यास सक्षम होतील यासाठी सदर हत्ती व इतर वन्य प्राण्या बरोबर कसं वागायचं यासाठी प्रशिक्षण पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आर. आर. काळे उप.वन निरिक्षक कोल्हापूर, एन एस कांबळे साह. वनरक्षक कोल्हापूर, स्मिता डाके वन परिक्षेत्र अधिकारी आजरा, संतोष शिंदे अर्जुन रिफायरीज. गडहिंग्लज. सह वन विभाग आजरा कर्मचारी आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.