Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रफुलेंच्या विचाराची जागृती काळाची गरज. - संपत देसाई,

फुलेंच्या विचाराची जागृती काळाची गरज. – संपत देसाई,

( जयंती दिनी पेरणोली हायस्कूलमध्ये व्याख्यान.)

आजरा : प्रतिनिधी.

सध्याच्या काळात सामाजिक समतोल बिघडत चालला आहे. अशा वेळी समतेचा व न्यायाचा विचार प्रसारासाठी महात्मा जोतिबा व क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची जागृती करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँ.संपत देसाई यांनी व्यक्त केले.
पेरणोली ता आजरा येथील हायस्कूलमध्ये युवा भारत सामाजिक संस्था व हायस्कूलच्या वतीने आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी होत्या.
काँ. देसाई म्हणाले, फुले दाम्पत्य हे श्रीमंत होते.ज्यावेळी घरातून बाहेर काढले त्यावेळी फुले दाम्पत्याने संपत्तीपेक्षा शाळा सुरू करण्याला प्राधान्य दिले. सावित्रीबाईंनी अनेक संकटांना तोंड देत धैर्याने शाळा चालविल्या त्यामूळेच आजच्या महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत.यावेळी नगराध्यक्षा चराटी,कृष्णा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बुरूडे सरपंच अमर पाटील, जितेंद्र निर्मळे,आर एस कांबळे, निवृत्ती ढोकरे, पार्थ दोरूगडे, स्वप्निल सावंत, महेश सुतार, रामदास कोडक,सागर कालेकर, संजय जाधव आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस आर कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन संदीप फगरे यांनी केले.आभार हेमलता कामत यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.