कोल्हापूर. प्रतिनिधी. ०३
आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विक्रमनगर येथील भाई माधवराव बागल हायस्कूल येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला.
लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी लस घेण्यासाठी सकाळपासूनच विद्यालयांमध्ये येत आहेत. या *केंद्रावर सकाळपासून शंभरहून अधिक मुलामुलींचे लसीकरण करण्यात आले आहे. हे चित्र नक्कीच सकारात्मक असून जिल्ह्यातील पात्र मुलामुलींचे लसीकरण लवकरच पूर्ण होईल, हा विश्वास आहे.
पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अत्यंत नियोजनबद्ध काम करत असून जिल्ह्यातील १००% पहिला डोस घेणाऱ्या गावांनी ५०० चा टप्पा पार केला असून ४४ गावांमध्ये १००% नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.
माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण किंवा आपल्या परिवारातील, शेजारील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी.
लस घेऊया, सुरक्षित राहूया.
