Homeकोंकण - ठाणे"मुंबई-पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडलीय.- स्थिती आणखी बिघडली तर कठोर निर्णय...

“मुंबई-पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडलीय.- स्थिती आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल” उपमुख्यमंत्री अजित पवार

तर राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण श्री. पवार यांनी दिली माहिती

मुंबई:-प्रतिनिधी.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.राज्य सरकारकडून काही प्रमाणात निर्बंध सुद्धा लावण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर निर्बंध लावण्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. यंदाच्या वर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे 204 वा शौर्यदिन कार्यक्रम होतोय. यावेळी विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

लॉकडाऊनचे संकेत?

राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत.सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल.

कोरोनाच्या अनेक लाटा येणार?  तीन दवसांत स्थिती बिघडलीय

काल मुख्यमंत्र्यांनी तीन तास टास्कफोर्ससोबत बैठक घेतली. मुंबई, पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडली आहे.शर्यती, सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत राज्यात सगळ्यांनी त्याची अमल बजावणी करा असंही अजित पवार म्हणाले.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अजित पवारांकडून अभिवादन

महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे.कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईत लढलेल्या, शहिद झालेल्या वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील वीरांना वंदन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींबद्दल आदर व्यक्त करून जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांनी कोरोना प्रतिबंधक नियम तसेच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावे, शक्यतो आपापल्या घरूनच जयस्तंभास अभिवादन आणि शहीद वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
भारतात एकीकडे ओमिक्रॉनचा संसर्गात वाढ होताना दिसत आहे. तर चिंताजनक बाब म्हणजे ओमिक्रॉनची सर्वाधिक 454 प्रकरणे महाराष्ट्रात आहेत, तर, दिल्ली 35 दुसऱ्या क्रमांकावर आहे.अशातच अधिवेशनाच्या केवळ 5 दिवसांत 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोनाबाधित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शौर्यदिनानिमित्त भिमा-कोरेगाव येथे अभिवादन करायला आलेल्या अजित पवार यांनी राज्यातील राजकीय मंडळींना कोरोना झाल्याची माहिती दिली.

राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पहा कोण आहेत ते

यात प्राजक्त तनपुरे- राज्यमंत्री, सुप्रिया सुळे- खासदार , वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री, के. सी. पाडवी, आदिवासी विकास मंत्री, बाळासाहेब थोरात- महसूल मंत्री, यशोमती ठाकूर- महिला व बालकल्याण मंत्री, दिलीप वळसे पाटील- गहमंत्री आदी नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर समीर मेघे- आमदार, भाजप, माधुरी मिसाळ- आमदार, भाजप, हर्षवर्धन पाटील, भाजप नेते, राधाकृष्ण विखे-पाटील, भाजप नेते, भाजप आमदार चंद्रकांत पाटील, यांंनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

…अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही 

या नव्यावर्षात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट समोर येऊन उभे ठाकले आहे. आधीच राज्यात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात तिसरी लाट धडकली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच, राज्यात आला लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.