Homeकोंकण - ठाणेकोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा.- उत्कृष्ट पत्रकार.- आजरा ता. पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत...

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा.- उत्कृष्ट पत्रकार.- आजरा ता. पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत यांना जाहीर.

आजरा. प्रतिनिधी.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार ‘मृत्युंजय महान्यूज’ चे संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांना जाहीर झाला आहे. रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे सकाळी १० वाजता दैनिक सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक मा.श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक मा. डॉ. शैलेश बलकवडे , संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त मा. विनायक भोसले, प्रमुख उपस्थिती संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य मा.विराट गिरी, कार्यकारी संपादक बी न्यूज मा. ताज मुल्लाणी , दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार मा. समिर देशपांडे, दैनिक नवराष्ट्रचे आवृत्ती प्रमुख मा. दीपक घाटगे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे. ज्योतिप्रसाद सावंत यांना यापूर्वी जिल्हा परिषदेचा पहिला आचार्य अत्रे तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला आहे. सह्याद्री लाईव्ह च्या वतीने त्यांचा आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला आहे. आजरा येथील आनंदराव कोरगावकर ट्रस्ट तर्फेही त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचे यांच्यासह ठिकाणी यांचा यथोचित सन्मान झाला आहे. गेली २७ वर्षे ते वृत्तपत्र क्षेत्रामध्ये पूर्णवेळ पत्रकारिता करीत आहेत यापूर्वी त्यांनी दैनिक पुढारी व दैनिक लोकमत करिता आजरा तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले. आहे सध्या ते मृत्युंजय महान्यूज या पोर्टल चॅनलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहतात. नुकतीच त्यांच्यावर नवभारत टाइम्स ग्रुपच्या नवराष्ट्र या दैनिकाची आजरा तालुका प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व राजकीय चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकीय विश्लेषक अशीही त्यांची ओळख आहे. चौफेर लिखाणाची क्षमता असलेल्या पत्रकार सावंत यांना मिळालेल्या सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.