Homeकोंकण - ठाणेआजरा अर्बन बँकेकडून अन्नप्रक्रिया सूक्ष्म उद्योगासाठी अल्प व्याजदरात योजना मेळावा संपन्न.

आजरा अर्बन बँकेकडून अन्नप्रक्रिया सूक्ष्म उद्योगासाठी अल्प व्याजदरात योजना मेळावा संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा कोल्हापूर आणि आजरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. आजरा (मल्टी – स्टेट) यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न प्रक्रिया सुक्ष्म उद्योजकांसाठी कार्यक्रम अण्णा – भाऊ संस्कृतीक सभागृह आजरा येथे पार पडला कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांमधील सुषमा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती विभागीय कृषी सह संचालक उमेश पाटील कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी श्री मोमिन यांनी माहिती दिली या योजनेअंतर्गत असंघटित उद्योजकांना ३५ टक्के इतके अनुदान केंद्र शासनामार्फत मिळणार आहे या योजनेअंतर्गत गुळ, राईस, नाचणी, काजूगर, आवळा, कोकम इ. उद्योगांची माहिती देण्यात आली यानंतर विविध उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंकासमाधान कृषी अधिकारी यांनी केलेले आहे त्याबरोबर आजरा अर्बन बँकेच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित झाले बद्दल विभागीय कृषी सहसंचालक श्री पाटील यांनी बँकेचे आभार मानले याबरोबर अशोक येळकर ( जिल्हा संसाधन व्यक्ती ) यांनी की (डि. आर. पी.) बद्दल सविस्तर माहिती दिली बहुराज्यीय असणारी दि. आजरा अर्बन को-ऑप.बँक आपल्या ३२ शाखेद्वारे या उद्योजकांना नेहमीच आधार देणारी ठेवलेली आहे यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने अन्नप्रक्रिया सुक्ष्म उद्योगासाठी बँकेकडून कर्जासाठी दहा टक्के व्याजदर करण्यात आलेली माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी दिली याचा उद्योजकांना लाभ घ्यावा ही नम्र विनंती केली आहे बँकेचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन किशोर भुसारी, या विभागातील उद्योजकांनी अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख बँकेचे संचालक अशोक चराटी संचालक सुरेश डांग, विलास नाईक, प्रकाश वाटवे, डाॅ. दीपक सातोस्कर रमेश कुरुणकर, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंद फडके, प्रणिता केसरकर, शैला टोपले, अस्मिता सबनीस, सुनील मगदूम, सूर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी गोईलकर यांनी केले.आभार श्री. भुसारी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.