HomeUncategorizedविविध उपक्रमांनी अशोक अण्णांचा वाढदिवस होणार साजरा.

विविध उपक्रमांनी अशोक अण्णांचा वाढदिवस होणार साजरा.

विविध उपक्रमांनी अशोक अण्णांचा वाढदिवस होणार साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील नागरिकांना विविध वैद्यकीय तपासण्या व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आजरा हायस्कूल येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भिमराव पाटील राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.

तसेच खासदार धनंजय महाडिक व आमदार शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


आरोग्य शिबिरामध्ये दृष्टी व श्रवण तपासणी, महिला आरोग्य तपासणी, सोनोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग तपासणी, ईसीजी, टू डी इको, एक्स-रे आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी व वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.


या सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन अशोक (अण्णा) चराटी वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गौरव समितीने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.