आजरा. प्रतिनिधी. २३
आजरा पोलिस ठाणेकडिल २०१७ ते २०२१ या सालातील दाखल झालेले दारूबंदीचे ३६ गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल यामध्ये देशी-विदेशी बिअर असा एकूण ४ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शन माने न्यायालयातून सदर करण्याबाबतचे आदेश करून घेऊन आज दि. २३ रोजी सदरचा मुद्देमाल पोलिस आजरा येथील गांधीनगर येथे जेसीबीच्या साह्याने खड्डा काढून ३६ गुन्ह्यातील दारू बंदी गुन्ह्याचा जप्त माल राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस उपनिरीक्षक शीतल शिंदे यांचे उपस्थित दोन शासकीय पंच धनाजी चव्हाण व सुखदेव लुगडे यांचे समक्ष सहा.पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव व पोलिस ठाण्यातील पोलिस कारकून पो. हे. काॅ. देऊस्कर व पोलीस अमलदार यांनी नाश केला.
आजरा तालुक्यात प्रथमच जप्त केलेल्या दारुचा नाश करण्याचे काम पाहायला मिळाले..
यामुळे आजरा तालुक्यात स.पो.नि सुनिल हरुगडे सह पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे.
