Homeकोंकण - ठाणेआजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या ग्रामउद्योजकांची मार्गदर्शन बैठक संपन्न.

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या ग्रामउद्योजकांची मार्गदर्शन बैठक संपन्न.

आजरा. प्रतिनिधी. ०५

आजरा येथील आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी लिमिटेडची ग्राम उद्योजकांची बैठक हॉटेल विनोद येथील सभाग्रहात संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी आजरा अर्बनचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक संभाजी जाधव यांनी केले. यावेळी आजरा तालुक्यातील उपस्थित असलेल्या ग्राम उद्योजक यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून श्री देशपांडे म्हणाले आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी, विकासासाठी, व काही देण्यासाठी आपल्या दारी आलेली आहे. फक्त ११० रुपये भरुन सभासद होऊन कंपनीच्या माध्यमातून हत्ती गवताचे उत्पन्न घेऊन कंपनीला द्यावे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही कंपनी भारतात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज भारताची हवामानाची परिस्थिती ही अत्यंत घातक आहे. या सीएनजी गॅस मुळे प्रदूषण कमी होणार आहे. यासाठी भारतात सर्व तालुक्यात होणारी हत्ती गवतापासून सी.एन.जी गॅस बनवणारी कंपनी ही आपल्या आजरा तालुक्यात देखील आहे. आजरा तालुक्यात जास्ती – जास्त शेतकरी वर्गाने सभासद व्हावे. व येणाऱ्या काही महिन्यात ही कंपनी चालू होण्यासाठी आपण भागीदार व्हा व सर्वजण मिळून तालुक्याचा विकास करूया असे बोलताना डॉ. श्री देशपांडे म्हणाले. कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे ग्राम उद्योजकांना मार्गदर्शन करताना म्हणाले प्रत्येक गावातील ग्राम उद्योजकांनी आपली सभासद नोंदणी जास्तीत जास्त करावी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांना माहिती देऊन इच्छुक असल्यास याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत. व आजरा तालुक्यातील प्रत्येक घरातील शेतकऱ्यांनी या कंपनीचे भागधारक होऊन आजरा तालुक्याचा विकास करायचा आहे. आजरा तालुक्यातील ७० टक्के गावामध्ये ग्राम उद्योजक नेमले आहेत. त्या ग्रामोद्योगाच्या यांच्या माध्यमातून त्या – त्या गावातील शेतकरी वर्गाने सभासद व्हावे. व आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीचे भागीदार होऊन स्वता सोबत तालुक्याचा व देशाचा विकास करूया. यावेळी वडकशिवाले येथील ६०० शे. व उत्तुर येथील ३०० शे ग्राम उद्योजक यांनी सहाशे सभासद पूर्ण केल्याबद्दल त्यांना पाणी फिल्टर, व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा भेट देऊन कंपनीने अभिनंदन केले. यावेळी नुतन संचालक नारायण मुरुकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा तालुक्यातील ५२ गावातील ग्राम उद्योजक तसेच जेष्ट संचालक शिवाजी रावण, नारायण मुरकुटे, रामचंद्र मुरकुटे सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

[ आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी यांनी नूतन संचालक म्हणून नारायण मुरकुटे, पत्रकार संभाजी जाधव, रामचंद्र मुरकुटे यांना कंपनीचे कार्यकारी संचालक श्री वाघमारे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्री देशपांडे यांच्या हस्ते नूतन संचालक म्हणून नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.