विश्वासाच्या बळावर आजरा अर्बन बँकेची भरारी,
( दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रु. १२०० कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण.)
आजरा.- प्रतिनिधी
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एकाच दिवसात तब्बल ९ कोटी ३७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, १५८७ नवीन खाती उघडण्यात आली आहेत. सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांनी बँकेवर दाखविलेल्या दृढ विश्वासामुळे बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत.

बँकेने सहकार क्षेत्रात आपल्या विश्वासार्ह कार्यपद्धतीच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांनी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवून बँकेच्या प्रगतीला हातभार लावला आहे.

त्यामुळे सध्या बँकेकडे एकूण १२०१ कोटी रुपयाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख मा. श्री. अशोकअण्णा चराटीसो व मा. संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले असून सर्वांना बँकेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

बँकेने केंद्र शासनाची PMFME (सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP तसेच राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच माफक व्याजदरात ॲपल कर्ज योजना व पर्यटकांसाठी हमसफर कर्ज योजना राबविल्या आहेत.

बँकेमध्ये आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे. मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे ई-पासबुक इ. सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे मत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटीसो यांनी व्यक्त केले.



