Homeकोंकण - ठाणेराष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीची शरद पवारांनी घेतली गंभीर दखल.- शशिकांत शिंदेंसोबत बंद दाराआड...

राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीची शरद पवारांनी घेतली गंभीर दखल.- शशिकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

वाई – प्रतिनिधी.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याची दखल घेतली आहे. एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आलेल्या शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड चर्चा झाली.

शरद पवार यांनी बँक निवडणुकीत झालेल्या प्रकाराबाबत शशिकांत शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी साताऱ्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे उपस्थित होते. मात्र बैठकीतील चर्चेबाबत माहिती मिळू शकली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करत बोंब केली. याची शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातील वाद मिटविण्यासाठी त्यांनी सर्वांशी चर्चा केली.

दरम्यान बँकेच्या निवडणुकीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेची अवहेलना केली.त्याची तक्रार पक्षश्रेष्टींकडे करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात सांगितले.आगामी पालिका जिल्हापरिषद निवडणुकीत शिवसेना काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा देसाई यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.