आजरा. प्रतिनिधी. २३
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे साह. शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षिकेचे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या महिला सखीमंच या विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध व गायन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले यामध्ये निबंध स्पर्धेत श्रीमती अस्मिता पुंडपळ,यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर सौ वैशाली वडवळेकर, याने द्वितीय क्रमांक पटकावला गायन स्पर्धेत श्रीमंती अशा गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकावला वरील स्पर्धेतील प्राप्त शिक्षक यांचे प्रयोग शाळेतील महाल शिक्षण मंडळ आजरा वतीने शुभेच्छा व सत्कार पार पडला सदर कार्यक्रमाला उपाध्यक्ष श्री आप्पासो पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व्यासपीठावर संस्थेचे संचालक माजी प्राचार्य सुनिल देसाई प्राचार्य पर्यवेक्षक एस जी खोराटे ज्येष्ठ शिक्षक आर.जी.कुंभार व सत्कार मूर्ती उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सत्कारमूर्ती शिक्षकांचे कौतुक करताना संस्थेचे संचालक सुनील देसाई यांनी मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा साहित्यिक परंपरेचा वारसा आजही प्रशालेतील शिक्षकांनी निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जपला आहे. प्रशालेतील यामुळे जिल्हाभर प्रशालेचा लौकिक वाढला आहे असे गौरवोद्गार आपल्या मनोगतातून व्यक्त केले प्राचार्य एस बी गुरव यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्ती शिक्षकांना पुढील येणाऱ्या काळात आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मिळेल या व्यासपीठावरून आपल्या प्रशालेचा नावलौकिक वाढला सल्ला दिला व उत्तर देताना प्रतिनिधी स्वरूपात श्रीमती पुंडपळ त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सूत्रसंचालन पाटील यांनी केले एस. एन. गुरव यांनी आभार मानले.