मुंबई. प्रतिनिधी.
सिनेनाट्य साहित्य आणि कलाक्षेत्रात आपण पहातच आलोय अनेक वाहिन्यांवरील टि.व्ही. सिरीयल्स, अनेक मोठ मोठ्या ओटीटी वरून रिलीज होणारे चित्रपट, वेब सिरीज, सिरीयल्स मध्ये विशिष्ठ जाती धर्मातील कलाकारांचा भरणा करून त्याच त्या कलाकारांना प्रेझेंट करण्यात येते, एवढेच न्हवेतर विविध वाहिन्यांवर देखील जाहीर करण्यात येणारे पुरस्कार देखील “त्याच विशिष्ठ लॉबी” तील विशिष्ठ कलाकारांना दिले जातात… यावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी…. लॉबी असणे खूपच गरजेचे आहे….. अशाच पध्दतीने ओबीसी प्रवर्गातील कलाकारांची आपली लॉबी असेल तरच आपणा सर्व ओबीसी कलाकार – तंत्रज्ञ – साहित्यिक लेखक कवी यांना भविष्यातील आपले अस्तित्व अबाधीत राखता येईल. तसेच या विशिष्ठ जाती धर्मातील कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणा-या वाहिन्यां आणि विविध सिरीयल च्या निर्माते मंडळींना दाखवून देऊ की…. ओबीसी कलाकार – तंत्रज्ञांना अस्पृश्य सदृष्य वागणूक देऊन कमीपणाचा दर्जा देणार असाल तर तुमची कोणतीही वाहिनी आणि सिरीयल आम्ही चालू देणार नाही… नव्हे नव्हे तर ओबीसी कलाकरांना वगळून तुमचे कामच होऊ शकत नाही… परंतु यासाठी आपण “ओबीसी लॉबी” निर्माण करणे गरजेचे आहे. या कारणासाठी स्वत:च्या अस्तित्वासाठी ओबीसी सिनेनाट्य कलामहासंघ म.राज्य – हि राज्यव्यापी संघटना बळकट करणे गरजेचे आहे..
सिनेनाट्य व साहित्य कला क्षेत्रामध्ये काम करणा-या सर्व बंधु भगिनींचे ओबीसी सिनेनाट्य कलामहासंघ महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेमध्ये स्वागत आहे.
लवकरच या राज्यस्तरीय संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. या राज्य कार्यकारिणी च्या माध्यमातून…. ओबीसी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, बँक कँमेरा टेक्निसियन च्या हितासाठी चे निर्णय घेतले जातील. ओबीसी कलाकार व फिल्म मेकर्स ची कृतीशील लॉबी निर्माण करण्यात येत आहे…. *राज्यकार्यकारिणी मध्ये सक्रीय सहभाग घेऊन ग्राऊंड फ्लोअर (तळागाळात जाऊन काम ) करणा-या ओबीसी कलाकार – तंत्रज्ञ – फिल्म मेकर्सचे मन:पुर्वक स्वागत. दत्ताभाऊ….मो. 9168187497
