Homeकोंकण - ठाणेअण्णा- भाऊ आजरा सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध. - डॉ. अनिल देशपांडे. व्हा. चेअरमन....

अण्णा- भाऊ आजरा सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध. – डॉ. अनिल देशपांडे. व्हा. चेअरमन. ( पालकमंत्री सतेज पाटील यांनी नूतन संचालकांचे केले अभिनंदन. )

आजरा. प्रतिनिधी. १९.

आजरा येथील अण्णा- भाऊ सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्री देशपांडे म्हणाले अण्णा भाऊ सुतगिरण सभासदांच्या हिताचा व संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे याबाबत संचालकांच्या मार्गदर्शनाने कामकाज चालू असते यापूर्वी सूतगिरणीचे काही बांधकाम सूतगिरणीच्या नफ्यातून केलेले आहे. सद्या संस्था नफ्यात असून बँकेचा एक हप्ता थांबलेला नाही सद्या पार पडलेला निवडणुकीचा कार्यक्रम यामध्ये एकच अर्ज विरोधात आला होता. परंतु देवर्डे येथील सभासद किरण तानवडे यांनी संस्थेचा चाललेला पारदर्शक कारभार पाहून आपला निवडणूक अर्ज माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे व्हा.चेअरमन श्री देशपांडे यांनी सांगितले संस्थेच्या वतीने श्री तानवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले राज्यात पहिल्या क्रमांकावर चांगल्या पद्धतीने चालू असलेली सुतगिरण म्हणजे अण्णाभाऊ सुतगिरण आहे. त्यामध्ये अत्याधुनिक मशनरी असल्याने फक्त परदेशात सुटगिरणी मध्ये अशा मशनरी उपलब्ध आहेत. तर आजरा सूतगिरणीमध्ये चांगल्या पद्धतीचे कामकाज कामगार व अधिकारी करत आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ३० कोटी रुपये कर्ज मंजूर झाले होते यामधील ६ कोटी कर्ज भागवले आहे. सर्व संचालकांच्या विचाराने आलेल्या अडचणी दूर करत चांगल्या पद्धतीने कारभार चालू असल्याने आजरा सुतगिरण व्यवस्थापन सूतगिरणी, गारमेंट सोबत अन्य व्यवसायाकडे वळत आहे.
[ आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी नव्याने आजरा तालुक्यात आली आहे. यामध्ये हत्ती गवतापासून सीएनजी गॅस प्रकल्पाची सुरुवात होत आहे. तालुक्यातील सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सदर प्रकल्पाची सुरुवात होत आहे. याकरिता आपल्या तालुक्यात स्वच्छ इंधन कॅन्सरमुक्त व केमिकल मुक्त सेंद्रिय शेती या दोन क्षेत्राच्या विकास या प्रकल्पाद्वारे होणार असल्याने शेतकरी सभासद यांना फायदा व्हावा. यासाठी सदर कंपनीला मदत करणार असल्याचे यावेळी अण्णा भाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष श्री चराटी यांनी बोलताना सांगितले. ] तसेच भविष्यात एन.सी.डी.सी च्या माध्यमातून कमी व्याज दराने कर्ज मिळणार आहे. यामुळे अण्णाभाऊ सूतगिरणीला चांगल्या पद्धतीने चालण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यातील सर्व संस्था चांगल्या पद्धतीने चालू आहेत संस्था चांगल्या पद्धतीने चा लाव्या यासाठी तालुक्यातील नेतेमंडळी एकमेकाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात या भूमिकेमुळे जिल्ह्यात आजरा तालुक्यातील संस्थेचे नावलौकिक वाढत आहे व भविष्यात ही ह्या सर्व संस्था चांगल्या पद्धतीने चालाव्या यासाठी आमचा प्रयत्न राहील. असे शेवटी बोलताना श्री. चराटी म्हणाले.

{ यावेळी जुने संचालक सोबत नूतन संचालक संदीप देशपांडे व शशिकांत सावंत यांना संधी देण्यात आली आहे. }
दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील हे सुतगिरणी येथे आजरा नगरपंचायत मधील नगरसेवक यांच्या भेटीगाठी साठी आले असता यावेळी मंत्री श्री पाटील यांनी सर्व नूतन संचालकांचे बिनविरोध निवडणूक झाल्याबद्दल अभिनंदन केले.

[ पालकमंत्री सतेज पाटील यांना विधान परिषद निवडणूक बाबत विचारले असता वातावरण पोषक आहे व मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले तर जिल्ह्यात भरघोस निधी दिला आहे. डी. पी. डी. सी. च्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरपंचायत आगीपासून संरक्षण व्हावे म्हणून फायर ब्रिगेडच्या गाड्या नगरपंचायत यांना दिल्या आहेत. सोबत ३० बुलेट मोटरसायकल अडचणीच्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या जाऊ शकत नाहीत. म्हणून मोटरसायकल दिल्या जाणार आहेत. सोबत देशात नव्यानेच दलित वस्ती मध्ये गरम पाणी नागरिकांना आंघोळीसाठी मिळाले म्हणून सोलर वॉटर बसवण्यात येणार असल्याचे बोलतात म्हणाले. यावेळी आम. राजेश पाटील. गोड साखरेचे संग्रामसिंह नलवडे, जि. प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जि. प. सदस्य उमेश आपटे, गडहिंलज उपसभापती विद्याधर गुरबे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आजरा कारखाना चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे, नगरसेवक नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ]

यावेळी सूतगिरणीच्या चेअरमन श्रीमंती अन्नपूर्णा चराटी सूतगिरणीचे सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.
संचालक शंकर टोपले यांनी सुत्रसंचालन केले तर आभार सचिन सटाले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.