Homeकोंकण - ठाणेआजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी वतीने. - एम. यु. पी धारकांचा सत्कार संपन्न.

आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी वतीने. – एम. यु. पी धारकांचा सत्कार संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी यांचे वतीने एम. यु .पी धारक ( ग्राम उद्योजक) यांचा सत्कार डॉ. अनिल देशपांडे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी मध्ये आजरा तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची सभासद नोंदणी सुरु आहे. ज्या गावांमध्ये ग्रामीण उद्योजक यांच्या माध्यमातून एका ग्रामपंचायत हद्दीतील ३०० शे सभासद पूर्ण झाले आहेत अशा ग्राम उद्योजकांचा कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील वडकशिवाले, लाकुडवाडी, उत्तुर, या गावातील ग्राम उद्योजकांना शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक श्री वाघमारे यांनी एम. यु. पी धारक ( ग्राम उद्योजक) यांना आजरा तालुक्यातील प्रत्येक गावात जास्तीत जास्त सभासद करावे प्रत्येक गावात ग्राम उद्योजक नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाने अधिक माहिती घेऊन सभासद व्हावे असे आवाहन केले आहे. यावेळी डॉ. श्री देशपांडे यांचा सत्कार कंपनीच्या वतीने करण्यात आला. यावेळी संचालक सुरेश दळवी, तसेच नारायण मुरकुटे, लाकुडवाडी चे सरपंच व ग्राम उद्योजक शंकर कुराडे, वडकशिवाले चे ग्राम उद्योजक श्री संपकाळ, उत्तुरचे श्री दळवी, मान्यवर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.