Homeकोंकण - ठाणेएस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन योग्यच - परंतु दीपावलीच्या तोंडावर प्रवाशांना वेठीस धरण...

एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन योग्यच – परंतु दीपावलीच्या तोंडावर प्रवाशांना वेठीस धरण कितपत योग्य. – कामही, व आंदोलनही करणे योग्य भुमिका ठरले.

आजरा. – प्रतिनिधी. ०१

आजरा सारख्या ग्रामीण भागा सह महाराष्ट्रात एस. टी (परिवाहन महामंडळ ) कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन योग्य आहे त्यांच्यावर होत असलेला अन्याय यासाठी आंदोलन करणे शिवाय कर्मचारी यांना पर्याय नाही. यासाठी सरकारने त्यांना न्याय द्यावा परंतु परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील प्रवासी यांची दिवाळी बाजार, माध्यमिक उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थी यामध्ये काही महाविद्यालयांच्या टेस्ट सुरू आहेत. दिवाळीची सुट्टी पडण्यापूर्वी जो कर्मचाऱ्यांचा बेकायदेशीर संप झाला. ,व यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान शेतकरी प्रवासी वर्गाचे दिवाळी बाजार राहून गेला आहे सध्या आपण कधी परिस्थितीतून सर्व जण बाहेर पडले आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी यांनी आपले काम चालू ठेवून आंदोलन करणे गरजेचे होते. परंतु सध्याचे सुरू असलेले आंदोलन हे प्रवासी वर्गाला वेठीस धरण्याचे आहे. अशी चर्चा आहे. आपल्यावरती अन्याय शासनाने केला असेलही पण ज्या प्रवाशांमुळे आपला उदरनिर्वाह चालतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे प्रवासी खासगी वाहनाकडे वळत आहेत. व खिशाला कात्री लागत आहे. तर शालेय विद्यार्थी दोन महिन्यापूर्वी शाळा सुरू झालेत तर सध्या घरीच बसले आहेत. या आंदोलनाला काही पक्ष विविध संघटना पाठिंबा देत आहेत. परंतु पाठिंबा देणार यापैकी काही पक्षाचे पक्षांनी स्वतः सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न का? मिटवले नाहीत असाही प्रश्न उपस्थित होत आहे एकंदरीत ग्रामीण भागातील प्रवासी यांना आपले आंदोलन योग्य आहे. असे जरी म्हणत असतील तरी आपला आंदोलनही बेकायदेशीर आहे. याचा त्रास आम्हाला होत आहे. यामुळे आपला आंदोलनाला प्रवाशांचाही पाठिंबा मिळेल परंतु काम चालू ठेवून आंदोलन करणे योग्य असेल शासनाने देखील जे कर्मचारी कामावर हजर नाहीत अशा कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई होत आहे. हा निर्णय शासनाचा अयोग्य आहे. सर्व कर्मचारी आपल्याकडे न्याय मागत आहेत.त्याच्या मागण्याचा विचार शासन दरबारी झाला पाहिजे पण यासाठी प्रवासी वर्गाची काही चुकी ज्याना दिपावली सारख्या सणाला बाजारात येता येत नाही.. शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. आपल्या मागण्या शासनाने कडे आहेत. मग प्रवाशांना कशासाठी वेठीस धरले जाते. असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी चालक, वाहक कर्मचारी यांनी काम चालू आंदोलन करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.