HomeUncategorizedदीपावली पाडव्याला स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा नवा विक्रम; एका दिवसात ४ कोटी ३८...

दीपावली पाडव्याला स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा नवा विक्रम; एका दिवसात ४ कोटी ३८ लाखांची ठेव संकलन.🟣जनता सहकारी गृहतारण संस्थेची दिवाळी पाडव्याला विक्रमी ठेवी संकलन.🟣जे. पी. नाईक पतसंस्थेची दिवाळी पाडव्याला २ कोटी ४९ लाखांची विक्रमी ठेव जमामुख्य कार्यालय आजरा, गडहिंग्लज व कोल्हापूर शाखांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

🟣दीपावली पाडव्याला स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा नवा विक्रम; एका दिवसात ४ कोटी ३८ लाखांची ठेव संकलन.
🟣जनता सहकारी गृहतारण संस्थेची दिवाळी पाडव्याला विक्रमी ठेवी संकलन.
🟣जे. पी. नाईक पतसंस्थेची दिवाळी पाडव्याला २ कोटी ४९ लाखांची विक्रमी ठेव जमा
मुख्य कार्यालय आजरा, गडहिंग्लज व कोल्हापूर शाखांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

🟣दीपावली पाडव्याला स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा नवा विक्रम; एका दिवसात ४ कोटी ३८ लाखांची ठेव संकलन.

आजरा : प्रतिनिधी

विश्वास, पारदर्शकता आणि सहकाराच्या मूल्यांची जपणूक करत सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा या संस्थेने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठेवी संकलनाचा नवा विक्रम नोंदविला. सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल ४ कोटी ३८ लाख रुपयांच्या ठेवी संकलित केल्या.
हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे केवळ आर्थिक यश नसून संस्थेने वर्षानुवर्षे जपलेल्या विश्वासाच्या नात्याची आणि सभासदांच्या आपुलकीची पावती असल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद सिद्धाप्पा भुसारी यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रात आर्थिक व्यवहारांपेक्षा विश्वासाचे नाते अधिक महत्त्वाचे असते. याच विश्वासाच्या केंद्रस्थानी ठेवून संस्थेने सभासदाभिमुख कारभार, आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि आधुनिक सेवांचा समन्वय साधला आहे. संस्थेच्या प्रगतीत प्रत्येक सभासदाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेकडे ४ कोटी ६९ लाख रुपये वसूल भागभांडवल, २०४ कोटी ५१ लाख रुपयांच्या ठेवी, १६३ कोटी २६ लाख रुपयांचे कर्जवाटप आणि ६४ कोटी ५२ लाख रुपयांची बँक गुंतवणूक आहे. संस्थेच्या एकूण नऊ शाखा असून सर्व शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत. संस्थेला सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला आहे.
सभासदांना ऑनलाइन वीजबिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, मनी ट्रान्सफर, एनईएफटी, आरटीजीएस, क्यूआर कोड, आयएमपीएस, एसएमएस आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

या विक्रमी ठेव संकलनासाठी सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चेअरमन दयानंद सिद्धाप्पा भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद श्रीकांत घुरे, सरव्यवस्थापक सुरेश बाळू सावंत व संचालक मंडळाने आभार मानले.

🟣जनता सहकारी गृहतारण संस्थेची दिवाळी पाडव्याला विक्रमी ठेवी संकलन.

आजरा : प्रतिनिधी.

जनता सहकारी गृहतारण संस्था मर्यादित, आजरा या संस्थेने दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली आणि पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील एकूण सात शाखांमध्ये एकाच दिवसात तब्बल ३ कोटी ४ लाख १५ हजार रुपयांच्या ठेवींचे संकलन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी ही माहिती दिली. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ग्राहक व ठेवीदारांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष मारुती मोरे म्हणाले की, संचालक मंडळाचे मार्गदर्शन, मुख्य कार्यालयातील संचालक मंडळ, सर्व शाखांचे चेअरमन, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे. त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या ठेवीदारांचे आभार मानले.

ग्राहकांच्या विश्वासावर आणि माणुसकीच्या नात्यावर उभी असलेली जनता सहकारी गृहतारण संस्था भविष्यातही उत्कृष्ट वित्तीय सेवा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

🟣जे. पी. नाईक पतसंस्थेची दिवाळी पाडव्याला २ कोटी ४९ लाखांची विक्रमी ठेव जमा
मुख्य कार्यालय आजरा, गडहिंग्लज व कोल्हापूर शाखांच्या संयुक्त प्रयत्नांना यश.

आजरा (प्रतिनिधी)

शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा या संस्थेने दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकाच दिवसात तब्बल २ कोटी ४९ लाख रुपयांच्या ठेवी संकलित करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
संस्थेचे मुख्य कार्यालय आजरा तसेच गडहिंग्लज व कोल्हापूर शाखांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष ठेव संकलन मोहीम राबविण्यात आली. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एकाच दिवसात २ कोटी रुपयांच्या ठेवी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या आवाहनाला सभासद, ठेवीदार, संचालक, सल्लागार, हितचिंतक व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्थेवरील सभासदांचा वाढता विश्वास, पारदर्शक कारभार, आकर्षक ठेव योजना आणि तत्पर ग्राहकसेवा यामुळे संस्थेची आर्थिक प्रगती सातत्याने होत आहे. मुख्य कार्यालयासह दोन्ही शाखांतील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन ही कामगिरी साध्य केली.

मुख्य कार्यालय आजरा, गडहिंग्लज व कोल्हापूर शाखांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे मिळालेले हे यश संस्थेच्या सहकार क्षेत्रातील प्रगतीचा नवा टप्पा ठरले आहे.
संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.