Homeकोंकण - ठाणेआजरा सूत गिरणीच्या कामगारांना ११ टक्के सानुग्रह अनुदानाची दिवाळी भेट.

आजरा सूत गिरणीच्या कामगारांना ११ टक्के सानुग्रह अनुदानाची दिवाळी भेट.

आजरा सूत गिरणीच्या कामगारांना ११ टक्के सानुग्रह अनुदानाची दिवाळी भेट.

आजरा : प्रतिनिधी.

आजरा सूत गिरणीच्या कामगार व कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षासाठी ११ टक्के सानुग्रह अनुदान दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत गिरणीचे प्रमुख व मार्गदर्शक अशोक चराटी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांच्या खात्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.


कामगार संघटनेशी संवाद साधताना चेअरमन डॉ. अनिल देशपांडे व सल्लागार चंद्रशेखर फडणीस यांनी सांगितले की, आजरा सूत गिरणी उत्पादनात चालू झाल्यापासून नियोजनबद्ध मार्गक्रमण करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही २५ हजार चात्यांचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सूत निर्यात बंद असतानाही सूताची गुणवत्ता कायम राखल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ‘आजरा स्पिन’ या नावाने ब्रँड तयार झाला आहे.

सूत गिरणीच्या यशस्वी वाटचालीमध्ये व्यवस्थापन आणि कामगार-कर्मचारी यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, काटकसर व सौहार्दाचे मोठे योगदान आहे. वस्त्रोद्योग व्यवसाय अनेक अडचणींचा सामना करीत असतानाही गिरणी व्यवस्थापनाने कामगारांच्या योगदानाची दखल घेत ११ टक्के सानुग्रह अनुदान जाहीर करून त्याची रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा केली आहे. या निर्णयाचे कामगारांनी आनंदाने स्वागत केले.
आजरा सूत गिरणी परिवार ही संकल्पना जपण्याचा व्यवस्थापनाने सातत्याने प्रयत्न केला आहे.

या यशामध्ये संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कामगार या सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


यावेळी सूत गिरणीचे संचालक अविनाश सोनटक्के, जयसिंग देसाई, रजनीकांत नाईक, जी.एम. पाटील, राजाराम पोतनिस, डॉ. इंद्रजीत देसाई, डॉ. संदीप देशपांडे, शिवकांत सावंत, मालुताई शेवाळे, मनीषा कुरुणकर, अनिकेत चराटी, हसन शेख, प्रॉडक्शन मॅनेजर कृष्णाजी कुलकर्णी, अधिकारी विष्णू पोवार, दत्तात्रय दोरकाडे, सचिन सटाले यांच्यासह कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.