दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जनता बँक आजराकडे एका दिवसात तब्बल रु. १८ कोटी २८ लाखाच्या ठेवी जमा.
आजरा :- प्रतिनिधी
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्यानिमित्त एका दिवसात तब्बल रु. १८ कोटी २८ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. याचा अर्थ सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहक यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास व बँकेबद्दल असलेली अस्मियता दिसून येते.

बँकेने आज पर्यंत अनेक यशाची शिखरे पार करत जिल्ह्यात तसेच देशात सर्वोत्कृष्ट बँक, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे अनेक सतत १० वर्षे पुरस्कार प्राप्त केले आहेत. बँकेने घरबांधणी करिता सावली गृहकर्ज योजना, कार लोन ९% व्याजदराने सुरू केली आहे. इतर सर्व वाहन तारण कर्जे १०% तसेच नव्याने सुरू करण्यात आलेली सोलार कर्ज योजना १०.००% व्याजदराने कमीत कमी कागदपत्र, कोणतेही हिडन चार्जेस न घेता सर्व शाखांमधून सुरू करण्यात आल्या आहेत.

बँकेने सर्व अद्यावत टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस चालू केली असून बँकेने यु.पी.आय., गुगल पे, फोन पे, क्यू आर कोड, भिम इ. सेवा चालू करून ग्राहकांना त्वरीत पेमेंट करणेची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बँकेकडे रु. ५१४ कोटी ठेवी व रु. ३४१ कोटी कर्जे, एकूण बँकेचा मिश्र व्यवसाय ८५५ कोटी इतका आहे.

बँकेचा ऑडिट वर्ग सतत “अ” आहे. तसेच रु. ४०.०६ कोटी इतके स्वभांडवल असून बँकेने एकूण रु. २१० कोटी गुंतवणूक असून एन.पी.ए. ०% राखून बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ECBA हा निकष पूर्ण केला आहे. मार्च २०२७ पर्यंत ६०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प आहे. बँकेकडे ७०००० हून अधिक समाधानी खातेदार, ३५००० चे वर सभासद असून बँकेला कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे याबरोबर ठाणे, मुंबई व मुंबई उपनगरे कार्यक्षेत्र मंजूर झाले आहे. बँकेकडे सर्व प्रकारच्या अद्यावत सोई-सुविधा उपलब्ध आहेत.

बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्जे, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त विकास महामंडळ यांची परतावा कर्ज योजना, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व्याज परतावा कर्ज योजना व पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (MFE) मार्फत दिल्या जाणाऱ्या रु. १० लाखापर्यंतची सबसिडी कर्ज देवून तरुण उद्योजकांना उभारी देण्याचे काम बँक करत आहे.

तसेच बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प केला आहे. असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई व बँकेचे सीईओ श्री. एम.बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. चेअरमन देसाई यांनी एका दिवसात १८ कोटी ठेव संकलनाचा टप्पा पार केलेबद्दल सर्व ठेवीदारांचे तसेच कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. बँकेबद्दलचे प्रेम व विश्वासअर्हता याचीच ही पोहोच पावती आहे असे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बँकेचे सर्व संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
