आजरा. प्रतिनिधी. ०४
आजरा आंबोली रोड वर दर्डेवाडी पासून जवळपास आजरा कारखाना पंर्यत कोणी अज्ञान वहान धारकाने मेलेल्या कोंबड्या टाकल्या आहेत. यामुळे परिसरातील मोकाट कुत्री तर रस्त्यावर फिरत आहेत. पण इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबडीचा मर होणे व कशामुळे हे देखील धक्कादायक आहे. ज्या वहान धारकाने मर कोंबड्या रस्त्याच्या शेजारी टाकल्या आहेत. यामुळे दुर्गंधी व मोकाट कुत्र्यांचा वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना त्रास होणार आहे. तरी मर झालेल्या कोंबड्या कोणी टाकल्या याची चौकशी व्हावी. असे परिसरातील नागरिक व वाहनधारकां कडुन मागणी होत आहे.
