Homeकोंकण - ठाणेस्व. बाबुराव कुंभार कार्यगौरव समारंभ संपन्न.

स्व. बाबुराव कुंभार कार्यगौरव समारंभ संपन्न.

आजरा. प्रतिनिधी. ३०.

आजरा येथील स्वर्गीय बाबुराव कुंभार गौरव समिती यांच्या वतीने स्वर्गीय बाबुराव कुंभार कार्यगौरव समारंभ कै. कुंभार यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गंगामाई वाचन मंदिरात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ समुहाचे प्रमुख अशोक चराटी होते. प्रमुख पाहुणे आम. प्रकाश आबिटकर होते. प्रास्ताविक प्रा. सुधीर मुंज केले यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना श्री. चराटी म्हणाले बाबुराव कुंभार हे अवलिया होते. माणूस म्हणून जगणारे नाते त्यांच्या बोलण्यामध्ये होते. त्यांच्या बोलण्याचा राग कुणीही कधी धरला नाही त्यांनी चांगली माणसं निर्माण करण्याचे काम केले माझ्या वैयक्तिक जीवनातील तीन पिढ्या सोबत त्यांच नात राहिल अजूनही त्या आठवणी डोळ्यासमोर दिसतात त्यांचे कार्य कौतुकास्पद होते. असे श्री. चराटी म्हणाले.
प्रमुख पाहुणे आम. आबिटकर म्हणाले बाबुराव कुंभार यांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्यासाठी यांची प्रेरणा महत्त्वाची ठरली आहे. आजरा तालुक्याची वेगळी ओळख आहे. या सर्वांची उणीव भरून काढण्यासाठी काढण्याची गरज आहे. ‘मरावे तरी कीर्ती रुपी उरावे’ त्याच्या राजकारणाततील उंची खुप मोठी आहे. समाजामध्ये राजकारण करणारी माणसे चांगली आली तर नक्की समाज सुधारतो व समाजाचा विकास होतो. कारण अलीकडच्या काळात राजकारण एवढी स्पर्धा कुठेच नाही. त्यांनी चांगली माणसं घडवण्याचे काम स्वर्गीय कुंभार यांनी खऱ्या अर्थाने केले असल्याचे बोलताना आम.श्री आबिटकर म्हणाले. या कार्यगौरव समारंभात वैशाली वुडळेकर, उत्तम कोकीतक, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून बोलताना प्रा. श्री मुंज यानी स्वर्गीय बाबुरावजी कुंभार यांच्या कार्याचा आढावा दिला. या कार्यगौरव समारंभ पुरस्कार मासेवाडी ग्रामपंचायत ता.आजरा, संवेदना फाउंडेशन आजरा, ग्रामसेवक कोवाडे – अंकुश पाटील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिजाऊ महिला बचत गट किटवडे ता. आजरा असे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा जोत्सना चराटी, सभापती उदय पवार, मुकुंद देसाई, महादेव उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, टोपले, नगरसेवक संभाजी पाटील, जनार्धन टोपले, नगरसेवक, तसेच सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आजरा शहरातील नागरिक उपस्थित होते. आभार भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.