Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या पत्रकार भवनाच्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार...

सिंधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या पत्रकार भवनाच्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सिंधुदुर्गच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली.

सिंधुदुर्ग:-प्रतिनिधी.२७

सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग अध्यक्ष आबा खवणेकर,सचिव शिरीष नाईक,उपाध्यक्ष समिल जळवी,प्रमोद गवस,खजिनदार संजना हळदिवे,मिलिंद धुरी,प्रसन्न गोंदावले,आनंद कांडरकर,विनय वाडकर प्रसाद मडगावकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच केली.

सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे 3 कोटी रुपये खर्च करून,पत्रकार भवनाचे काम सध्या सुरू आहे.तर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारकाचे काम अजूनही सुरू करण्यात आलेले नाही.तर जांभेकर यांच्या स्मारकासाठी उर्वरीत रक्कम 1 कोटी 55 लाख इतकी रक्कम अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर(B.D.S)वितरित करण्यात आल्याची माहिती नियोजन अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
लवकरात लवकर या पत्रकार भवनाचे काम तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचे काम पुर्ण व्हावे,यासाठी पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.