Homeकोंकण - ठाणेआजरा. समृद्धी प्रोड्यूसर कंपनी आपल्या दारी. - जैविकइंधन तयार करणाऱ्या प्रकल्पासाठी पुढाकार...

आजरा. समृद्धी प्रोड्यूसर कंपनी आपल्या दारी. – जैविकइंधन तयार करणाऱ्या प्रकल्पासाठी पुढाकार घेणारी एमसीएल ही संघटना होय.- कार्यकारी संचालक श्री वाघमारे.

आजरा. प्रतिनिधी. २७

एम. सी.एल. कंपनी देशातील अनेक तालुक्यात ही संस्था पर्यावरणाचे व भूमातेचे रक्षण व संवर्धन करणे या उद्देशासाठी निर्माण झालेली संस्था
भविष्यकाळात सेंद्रिय खता शिवाय पर्याय राहणार नाही. कारण शेतीसाठी सेंद्रिय खत वापरणे ही आज काळाची गरज आहे. यासाठी जैविकइंधन तयार करणाऱ्या प्रकल्पासाठी पुढाकार घेणारी एमसीएल ही संघटना आहे.
या अंतर्गत ‘आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनीमध्ये असणाऱ्या आर्थिक प्रतिकृती राबविण्यावर भर देणारी संस्था आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होणार असून या प्रकल्पामुळे बेरोजगार युवा-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
‘आजरा जैविक उत्पादक कंपनी’ आजरा तालुक्यात छत्रपती शाहू महाराज बायोफ्युएल प्रा. लि. आजरा. ता. आजरा. जि. कोल्हापूर समृद्धी संचलित व एम.सी.एल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही संस्था पर्यावरणाचे व भूमातेचे रक्षण व संवर्धन या उद्देशासाठी निर्माण झालेली संस्था असून, ही संघटना पर्यावरण, ऊर्जा आणि बहुजनांच्या सक्षमीकरणाकरिता कटिबद्ध आहे.
या संस्थेचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक व भूमातेची काळजी घेणाऱ्या अशा स्वच्छ इंधनाची निर्मिती करणे, सेंद्रिय खताची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देणे आणि तालुक्यातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे, हे तीन प्रमुख उद्देश आहेत.
एमसीएल ही संघटना पुढील पिढीकरता जैविक इंधन तयार करणाऱ्या अनेक प्रकल्पासाठी पुढाकार घेणारी संघटना आहे. एमसीएल ही मुख्यतः ‘ट्रिपल बॉटम लाईन ( समाज उपयोगी, पर्यावरण पूरक आर्थिक दृष्ट्या सक्षम ) प्रतिकृती राबविण्यावर भर देणारी संस्था असून, देशातील प्रत्येक एमसीएल प्रकल्पात आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक फायद्यांचा अंगभूत समावेश आहे. अशी याच तत्वावर आजरा येथील कंपनी सुरू होणार आहे. अशी माहिती आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी लिमिटेड कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी दिली पुढे म्हणाले तसेच जीवाश्म इंधनाला उत्तम पर्याय हत्ती गवत पासून तयार होणारे जैव इंधन आपल्या आजरा तालुक्यात तयार होणार आहे. इंधन निर्मितीला लागणारा कच्चा माल म्हणून हत्ती गवत, चारा गवत हे कमीत कमी पाणी लागणारे आणि भरघोस उत्पादन देणारे पीक आहे. संपूर्ण तालुक्यात या पिकाची लागवड होणार असून, यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे. या कंपनीच्या भागधारकांकडून हमी भावाने गवत विकत घेतले जाणार आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांला परवडेल अशा किमतीत आपण या कंपनीचे भागधारक होऊ शकता.
या कंपनीच्या भागधारकांकडून हमी भावाने हत्ती गवत विकत घेतले जाणार आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना परवडेल अशा किमान रकमेत आपण या कंपनीचे ( सभासद ) भागधारक होऊ शकता. यासाठी या कंपनीमध्ये प्रोसेसिंग फी शंभर रुपये व दहा रुपये शेअर्स प्रमाणे आपण अनेक शेअर्स घेऊ शकता. यासाठी आजरा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.