Homeकोंकण - ठाणेट्रकच्या धडकेने महिला मयत. - आजरा आंबोली रोडवर झाला अपघात.

ट्रकच्या धडकेने महिला मयत. – आजरा आंबोली रोडवर झाला अपघात.

आजरा. प्रतिनिधी. २५

आजरा येथील आंबोली रोडवर नविन पोलीस स्टेशन समोर दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास ट्रकचा अपघात एक महिला मयत झाली आहे सौ. शशिकला महादेव बागडी वय ४८ रा.पंडेवाडी ता. राधानगरी असे मयत महिलेचे नांव आहे. यामधील आरोपी मुनाफ गुलाब तकिलदार रा. दर्गा गल्ली आजरा. हा आपल्या ताब्यातील ट्रक नं. एम. एच. ०४ डि. के. ८३६१ मधुन अविचाराने निष्काळजीपणे हायगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने चालवत फिर्यादीची मोटरसायकल सी.डी.डीलक्स नं. एम. एच ०९ ए. एक्स ६६५ या मोटर सायकलला व्होव्हटेक करत फिर्यादीस जखमी करून मागे बसलेली शशिकला महादेव बागडी हिस गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत झाल्या बद्दल अशी फिर्याद शिवाजी धोंडीबा बुगडे यांनी आजरा पोलिसात दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार आजरा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. आजरा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. अधिक तपास घस्ती करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.