आजरा. प्रतिनिधी. २५
आजरा साखर कारखाना सुरू व्हावा ही इच्छाशक्ती सर्वांच्या मनामध्ये होती. अत्यंत चिकाटीने चेअरमन श्री शिंत्रे यांनी राज्यातील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा केला. व सर्वांच्या सहकार्यामुळेच आज आजरा साखर कारखाना गळीत हंगाम सुरू करता आला. खासदार संजय मंडलिक आजरा सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रास्ताविक चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले. खास. श्री. मंडलिक पुढे म्हणाले जिल्हा बँकेचे अध्यक्ष व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील सह अनेक संस्था नेतेमंडळी यांनी या कारखाना चालू होण्यासाठी सहकार्य केले यासाठी सद्या आर्थिक गणित संचालक मंडळ व सर्वांनी पथ्य पाळण्याची गरज आहे. यावेळी २००४ पासून २०२१ अखेर कारखान्यातील चढ-उतार याबाबतचा लेखाजोखा मांडला व कारखाना या पुढे चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी सर्वांना श्री. मंडलिक यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आजारी पडलेला साखर कारखाना कशा पद्धतीने सुरू करावा व कामगारांनी देखील आपला पगार कपात करून कारखाना सुरू होण्यासाठी जे योगदान दिले हा आदर्श महाराष्ट्रातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांनी घेण्यासारखा आहे.
यापुढील काळात मंत्री सतेज पाटील व आपण पाच हजार टनाचा कारखाना उभा करण्यासाठी व पन्नास हजाराचा बिसलेरी प्लॅट उभा करण्यासाठी सहकार्य करून पण संचालकांनी प्रामाणिकपणे काम करत एकी राहिली पाहिजे. व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
कारखाना सुरू होण्यासाठी चेअरमन शिंत्रे सह संचालकांनी सातत्याने पाठपुरावा करत मुंबई, कोल्हापूर प्रवास करून तांत्रिक अडचणी बाजूला करत वेळोवेळी मुश्रीफ साहेब व माझ्या मागे लागून लागेल तिथे मदत घेतली मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीही मदत केली व आपण जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने मदत करावी व हा कारखाना चालू व्हावा ही आमची देखील मनापासून इच्छा होती. परंतु आजरा कारखान्याने दाखवून दिलं हातात हात घालून काम केल्याने सगळं काही व्यवस्थित होतं यामुळेच हा बंद पडलेला कारखाना चालू करण्यास यश मिळाले आहे. असे मंत्री श्री पाटील बोलताना म्हणाले. प्रास्ताविक करताना श्री. शिंत्रे यांनी दोन वर्षे बंद असलेला आजरा साखर कारखाना चालू व्हावा यासाठी देशाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर्व नेते मंडळी मान्यवरांनी व अनेक संस्था राज्यातील नेते मंडळी यांनी सहकारी केल्यामुळेच आजरा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आपन पाहत आहोत. कारखाना सुरू होण्यासाठी तालुक्यातील संस्था, राज्यातील नेते मंडळी, व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर यांच्या सहकार्यामुळेच कारखाना चालू होत आहे. या सर्वांचा मी चेअरमन या नात्याने आभारी आहे. आजरा साखरचा गाळप हंगाम सन. २०२१/२२ करिता कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील ८ हजार ७०० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखाना मशनरी ओअर व्होलिंगचे काम वेळेत पूर्ण झालेने कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम करून कारखाना प्रत्यक्षात गाळपास सुरुवात करण्यात आली आहे. साखर कारखान्यावर या पूर्वीप्रमाणे आजरा तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून गळीत हंगाम आपण संपूर्ण ऊस आपल्या आजरा सहकारी साखर कारखान्यास द्यावा.असे अवाहन चेअरमन यांनी केले. हंगाम २०२१/२२ करिता आपल्या येणाऱ्या उसाची बिले देखील नियोजनानुसार वेळेत ऊस उत्पादकांना नियोजन कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखाना व्यवस्थापनाने केले असून २९०० रु. एफ. आर. पी जाहीर करत असल्याचे यावेळी चेअरमन श्री शिंत्रे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आम. प्रकाश आबिटकर आम. राजेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, नगरसेवक संभाजी पाटील, शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तसेच व्हा.चेअरमन आनंदराव कुलकर्णी व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक डॉ.तानाजी भोसले सह कामगार संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्य सभासद उपस्थित होते. स्वागत संचालक वसंत धूरे यांनी केले तर आभार जनार्दन टोपले यांनी मानले.
