Homeकोंकण - ठाणेआजरा साखरचा गळीत हंगाम शुभारंभ . मंत्री. - सतेज पाटील, हसन मुश्रीफ...

आजरा साखरचा गळीत हंगाम शुभारंभ . मंत्री. – सतेज पाटील, हसन मुश्रीफ शुभहस्ते संपन्न. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक

कार्यक्रमाचे अध्यक्ष खास. संजय मंडलिक. )

आजरा. प्रतिनिधी. २५

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दि. २५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष खास. संजय मडलिक होते. प्रास्ताविक प्रा. चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी केले.
श्री. शिंत्रे यांनी बंद असलेला आजरा साखर कारखाना चालू व्हावा यासाठी सर्व मान्यवरांनी व अनेक संस्था राज्यातील नेते मंडळी यांनी सहकारी केल्यामुळेच आजरा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आपन पाहत आहोत. कारखाना सुरू होण्यासाठी तालुक्यातील संस्था, राज्यातील नेते मंडळी, व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर यांच्या सहकार्यामुळेच कारखाना चालू होत आहे या सर्वांचा मी चेअरमन या नात्याने आभारी आहे.
आजरा साखरचा गाळप हंगाम सन. २०२२/२२ करिता कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ३३१ ठेकेदारास सोबत ऊस तोडणी वाहतुकीचे करार केलेले आहेत. कारखान्याकडे कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील ८ हजार ७०० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखाना मशनरी ओअर व्होलिंगचे काम वेळेत पूर्ण झालेने दि. २५ रोजी कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम करून कारखाना प्रत्यक्षात गाळपास सुरुवात करण्यात आली. साखर कारखान्यावर या पूर्वीप्रमाणे आजरा तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून येणारा येणारा गळीत हंगाम आपण संपूर्ण ऊस आपल्या आजरा सहकारी साखर कारखान्यास द्यावा. असे अवाहन चेअरमन व संचालक यांनी केले आहे. हंगाम २०२१/२२ करिता आपल्या येणाऱ्या उसाची बिले नियोजनानुसार देखील नियोजनानुसार वेळेत ऊस उत्पादकांना नियोजन कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकाऱ्यांने कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ ग्राम विकास मंत्री हसन, मंत्री सतेज पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेेेळी, आम. प्रकाश आबिटकर आम. राजेश पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर होते. तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.तानाजी भोसले सह कामगार संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्य सभासद उपस्थित होते. आभार जनार्दन टोपले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.