Homeकोंकण - ठाणेमला राजकारण करायचे नाही. - राज्यकरण करायचे आहे.- छोट्या तरुणांना मोठे उद्योजक...

मला राजकारण करायचे नाही. – राज्यकरण करायचे आहे.- छोट्या तरुणांना मोठे उद्योजक बनवणे हाच माझा अजेंडा. – राजे समरजितसिंह घाटगे.

१५० मंडळांना श्री.मोरया सामाजिक सेवा कार्य पुरस्कार प्रदान.

गडहिंग्लज,प्रतिनिधी.

मोठ्या बँका मोठ्या उद्योजकांना पायघड्या घालतात.त्या छोट्या तरूण उद्योजकाडे दुर्लक्ष करतात आम्ही मात्र छोट्या तरूणांना अर्थसहाय्य देत आहोत.अशा छोट्या तरूणांना मोठे उद्योजक बनविणे. हाच माझा येत्या तीन वर्षातील अजेंडा आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील गांधीनगर मधील गणेश सांस्कृतिक भवन मध्ये राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन आयोजित श्री.मोरया सामाजिक सेवा कार्य पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कागल,गडहिंग्लज,उत्तूरसह जिल्ह्यातील १५० हून मंडळे व सेवाभावी संस्थांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या हस्ते गौरव केला.
ते पूढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या स्वप्नातील आदर्श कागल घडविण्यासाठी व विकासासाठी युवा पिढीने गट-तट बाजुला ठेवून एकत्र यावे.त्यांनी स्वावलंबी करून कुणाच्या दारात जावे लागू नये.नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे तरूण आम्ही घडविणार आहोत.त्यासाठी त्यांना ते करणार असलेल्या व्यवसायाचे प्रशिक्षण ,मार्गदर्शन अर्थसहाय्य व शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली उपल्बध करून देणार आहोत. शाहू साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी सर्वप्रथम जाहिर केल्याबद्दल श्री.घाटगे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने ऊसाची मोळी देऊन आगळावेगळा सत्कार केला. श्री.घाटगे यांचा गडहिंग्लज भाजपा पदाधिकाऱ्यांनी संकेश्वर – बांदा मार्ग व कागलच्या लक्ष्मी टेकडीजवळील उड्डाण पूलास मंजुरीसाठीच्या पाठपुराव्याबद्दल सत्कार केला.
व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्या अनिता चौगुले,पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले,राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव ,रविंद्र घोरपडे,अनिल मोरे,भाजपा महिला शहराध्यक्षा बेनिता डायस, उदय देसाई,सरपंच संजय बटकडली,अजीत जामदार,सरपंच रेखा जाधव,उमेश देसाई,प्रीतम कापसे,प्रदिप लोकरे,शैलेश मुळीक,आतीषकुमार देसाई,सुनिल गुरव,चंद्रकांत सावंत,द्राक्षायणी घुगरी,निलांबरी भुईंबर आदी मान्यवर उपस्थित होते. दिप प्रज्वलन व श्री गणेश मुर्ती,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व स्व राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.
स्वागत भाजपाचे गडहिंग्लज शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी केले. प्रीतम कापसे यांनी आभार मानले.

चौकट

[ १०० गंगाराम कांबळे घडविणार
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात गंगाराम कांबळे या दलित समाजातील युवकास यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभे केले होते. त्यांच्या जनक घराण्याचा वंशज या नात्याने मी डिक्की (दलित संघटना पुणे) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या माध्यमातून दलित तरूणांसाठी नोव्हेंबर मध्ये कार्यशाळा होणार आहे.त्या माध्यमातून गंगाराम कांबळे यांच्यासरखे दलित समाजातील १०० उद्योजक घडविणार असलेच मानस श्री.घाटगे यांनी व्यक्त केला. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.