( सुधीर सुपल यांची मनसे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड )
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दि. २४ रोजी नूतन पदाधिकारी निवड व पक्षप्रवेश तसेच नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले होते. प्रास्ताविक ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री चौगुले म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तरुणांचा ओग वाढतच आहे. कारण मनसे हा पक्ष नसून एक कुटुंब आहे. या ठिकाणी कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय केला जात नाही तर त्याला न्याय दिला जातो. येणाऱ्या काही दिवसात महिलांसाठी रोजगार मनसेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी मनसे पुढील काळात काम करणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मध्ये मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. परंतु यापुढे काम न करणाऱ्या पदाधिकारी यांची गय केली जाणार नाही सर्व पदाधिकारी व मनसैनिकांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे असेही श्री चौगुले यांनी बोलताना सांगितले.
यावेळी नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. श्री. सुपल याची आजरा – भुदरगड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यामध्ये तुषार येजरे – उपतालुका अध्यक्ष ( उत्तुर जि.प.) आश्विण एकनाथ राणे – विद्यार्थि सेना तालुका अध्यक्ष, वैश्नव हनमंत दळवी – विभाग प्रमुख (पेरनोली पंचायत समिती) अभिजित पाटील – विभाग प्रमुख (कोळिंद्रे जि.प.) विष्णू चौगुले – विभाग प्रमुख पेरनोली पंचायत समिती, ओमकार तुकाराम माडभगत -(विद्यार्थी सेना सचिव ) दिगंभर जाधव – विभाग प्रमुख सागर खरुडे – विद्यार्थिसेना उपाध्यक्ष यांची निवड करण्यात व यापूर्वी निवड केलेल्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. ता. अध्यक्ष अनिल निऊंगरे यांनी आपल्या मनोगत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहावे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाध्यक्ष श्री चौगुले यांच्या उपस्थितीत लवकरच घेण्यात येणार आहेत तेव्हा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे यासाठी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा व नूतन पदाधिकारी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत मी आपल्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले मनसे राज्य कार्यकारिणी सदस्या वैभव माळवे, महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम भादवणकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश कांबळे, महिला ता.अध्यक्ष सरिता सावंत तसेच तुषार येजरे, प्रमोदिनी देसाई, अश्विन राणे, शोभा कांबळे , वैष्णव दळवी, सतिश किल्लेदार, अभिजीत पाटील, विश्वास कळसकर, विष्णू चौगुले, ओमकार माडभगत, प्रदिप पाटील, प्रथमेश सुकवे, वसंत घाटगे. थैरूणबी आगा, तुकाराम साबळे, विठ्ठल येडगे, चिंतामणी येडगे.सागर खरूडे, राजेंद्र येसणे, संजय भादवणकर, मोहन भादवणकर
या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन सचिव चंद्रकांत सांबरेकर यांनी केले तर महिला आघाडी उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई आभार मानले.
