आजरा.प्रतिनिधी.२४
महाराष्ट्राचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना कोरोणाची लागण झाली आहे. यासाठी आजऱ्यात मनसैनिकांनी महाआरती करत श्री. रवळनाथास आमच्या राज साहेबांना कोरोणातून लवकर बरे करा असे साकडे मनसैनिकांनी घातले व महाआरती केली. श्री रवळनाथ मंदिर आजरा. जिल्हा कोल्हापूर येथे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, नूतन मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पुनम भादवणकर, आजरा तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, सचिव चंद्रकांत सांबरेकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरिता सावंत, उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई , मनसे उपाध्यक्ष आनंदा घंटे, प्रकाश कांबळे सह सर्व पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी मनसे सैनिक उपस्थित होते
