आजरा. प्रतिनिधी. २३
आण्णा – भाऊ आजरा सूत गिरणी व गारमेंट विभागाच्या कामगार कर्मचारी यांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या सालातील १२ टक्के रक्कम बोनस दीपावली ची भेट म्हणून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व सूतगिरणीचे मार्गदर्शक अशोक चराटी यांनी दिली. अध्यक्षस्थानी श्रीमती अन्नपूर्णा चराटी होत्या. बोनस निर्णय संबंधी कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना संस्थेचे ॲडव्हायझर चंद्रशेखर फडणीस म्हणाले आजरा सूतगिरणी उत्पादनास चालू झाले पासून नियोजनबद्ध मार्गक्रमण करीत आहे. सध्या सूत गिरणी मध्ये २२७०० चात्यावर सुताचे उत्पादन सुरू आहे. कोरोणा सारख्या आजारावर नकारात्मक व भयावह अशा वातावरणामध्ये देखील कामगार कर्मचारी यांनी सूतगिरणी सुरू ठेवण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. तसेच सूतगिरणी व्यवस्थापनाने देखील वरून प्रतिबंधात्मक विविध उपाय योजना राबवल्या असल्याने नियमितपणे सर्व कामगार कर्मचारी यांनी वाफ घ्यावी. याकरिता वाफेचे मशीन हळदपाणी मास्क पूर्ण प्रतिबंधक मेडिसिन्स देऊन सोशल डिस्टन्स पाळणे करिता निरंतर मार्गदर्शन केले गेले. सूतगिरणीच्या यशस्वी वाटचालीमध्ये सूतगिरणीचे व्यवस्थापन व कामगार कर्मचारी यांचे तीन उत्कृष्ट समन्वय सौहार्दाचे नाते यांचा मोठा वाटा आहे. वास्तविक पाहता मागील दोन ते तीन वर्षापासून वास्तू उद्योग व्यवसाय मोठा अडचणींमधून वाटचाल करीत होता. तरी देखील आजरा सुतगिरण व्यवस्थापनाने कामगार कर्मचारी यांच्या हिताचा विचार करून बारा टक्के बोनस दीपावली भेट म्हणून जाहीर केला आहे. व कामगारांनी देखील त्याचा आनंदाने स्वीकार करून यांच्यातील व व्यवस्थापनातील नातेसंबंधांमधील गोडवा जपलेला आहे. आजरा सुतगिरण व्यवस्थापनाने काटेकोट नियोजन बद्ध बरोबर कामगार कर्मचारी यांचे कल्याणार्थ विविध योजना राबवल्या आहेत. व त्याचाच परिपाक म्हणून आजरा सूतगिरणीचे हे एक साधिक यश आहे. ज्यामध्ये सूतगिरणीचे संचालक मंडळ व सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. या सर्वांचा विचार करता सूतगिरणीच्या संचालक मंडळाने कामगार कर्मचारी यांना १२ टक्के रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले याप्रसंगी सुतगीरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे संचालक हरी नार्वेकर, शंकर उर्फ भैय्या टोपले, कृष्णात गिरीगोसावी जयसिंग देसाई, सौरभ नाईक, जी. एन. पाटील, राजू पोतनीस, मालुताई शेवाळे, मनीषा कुरुनकर, तज्ञ संचालक संदीप देशपांडे, हसन शेख, तसेच संस्थेचे जनरल मॅनेजर अमोल वाघ, अधिकारी विष्णू पवार, सचिन सटाले, राजेंद्र धुमाळ आर. एस. पाटील ,श्रीकांत कुलकर्णी, शामली वाघ, तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील व त्यांचे सहकारी कामगार कर्मचारी उपस्थित होते.
