Homeकोंकण - ठाणेआजरा कारखान्याचे देय एफ.आर.पी पैकी शिल्लक ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. -...

आजरा कारखान्याचे देय एफ.आर.पी पैकी शिल्लक ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. – प्रा. शिंत्रे.

आजरा. प्रतिनिधी. २१

आजरा साखर कारखान्याने सन. २०१८/१९ गळीत हंगामात ३ लाख १३ हजार ४७ मे. टन. उसाचे गाळप केले होते. सदर ऊसाचे देय बिल एफ. आर. पी रकमेपैकी राहिलेली शिल्लक प्रति मे. टन ८३. १३ प्रमाणे एकूण रक्कम रुपये २ कोटी ६० लाख २३ हजार ६६९ ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना खात्यावर बँकेत वर्ग केली आहे. तरी संबंधित धारकांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन कारखाना चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली आहे.
गाळप हंगाम सन. २०२२/२२ करिता कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ३३१ ठेकेदारास सोबत ऊस तोडणी वाहतुकीचे करार केलेले आहेत. कारखान्याकडे कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील ८ हजार ७०० ट्रॅक्टर उसाची नोंद झाली असून कारखाना मशनरी ओअर व्होलिंगचे काम पूर्ण झाले आहे. दि. २५/१०/२०२१ रोजी कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम करून कारखाना प्रत्यक्षात गाळपास सुरुवात करणार आहे. साखर कारखान्यावर या पूर्वीप्रमाणे आजरा तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून येणारा येणारा गळीत हंगाम आपण संपूर्ण ऊस आपल्या आजरा सहकारी साखर कारखान्यास द्यावा. असे अवाहन चेअरमन व संचालक यांनी केले आहे. हंगाम २०२१/२२ करिता आपल्या येणाऱ्या उसाची बिले नियोजनानुसार देखील नियोजनानुसार वेळेत ऊस उत्पादकांना नियोजन कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकाऱ्यांने कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन श्री शिंत्रे. यांनी दिली. यावेळी व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.तानाजी भोसले यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.