Homeकोंकण - ठाणेराष्ट्रीय महामार्ग भादवणवाडी ते घाटकरवाडी पंर्यतच्या रस्त्याची डागडुजी करावी. - मनसेच्या मागणीला...

राष्ट्रीय महामार्ग भादवणवाडी ते घाटकरवाडी पंर्यतच्या रस्त्याची डागडुजी करावी. – मनसेच्या मागणीला यश. – खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात

आजरा. प्रतिनिधी. २०

राष्ट्रीय महामार्ग ५४८ हा रस्ता संकेश्वर ते बांधा पैकी मौजे. भादवणवाडी ते घाटकरवाडी पंर्यतच्या रस्त्याची डागडुजी व्हावी. अशा याचे निवेदन आजरा मनसे यांनी तहसीलदार आजरा यांना देऊन आंदोलनाचा इशारा आजरा मनसेने दिला होता. या मागणीला यश आले. लागलीच दोन दिवसात खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५४८ हा रस्ता संकेश्वर ते बांधा असा राष्ट्रीय महामार्ग करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने आजरा तालुक्यामधील मौजे भादवणवाडी ते मौजे घाटकरवाडीवाडी असा रस्ता राष्ट्रीय महामार्ग महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. परंतु आजमितीस सदर रस्ता दुर्लक्षित झालेला असून रस्त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामध्ये ऊस वाहतूक चालू झाल्यानंतर अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच रस्ता होणार आहे. सदर माती टाकून खड्डे भरण्याचे कामकाज न करता संबंधित कार्यालयांना आपल्या मार्फत कडून समज देऊन खड्डे हे खडी डांबर त्याचा योग्य वापर करून भरण्यात यावे. व नादुरुस्त रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा या अनुषंगाने डांबर व खडी मिश्रित खड्डे भरण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग यांनी चालू केले आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनला यश आले असल्याचे बोलले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.