Homeकोंकण - ठाणेइचलकरंजीत धारधार शस्त्राने संतोष जाधवचा खुन केलेले आरोपीना.- गडहिंग्लज परिसरातुन ताब्यात.

इचलकरंजीत धारधार शस्त्राने संतोष जाधवचा खुन केलेले आरोपीना.- गडहिंग्लज परिसरातुन ताब्यात.

कोल्हापूर. प्रतिनिधी.

इचलकरंजी येथे शनिवारी रात्री धारधार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय ४२, रा. जवाहरनगर) याचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. असून
या टोळीतील सहाजण गडहिंग्लज परिसरातून मिळून आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली.
शुभम बाळासो काणे( वय २४), निखिल चंद्रकांत माने (वय २१), विपुल आप्पासो नाईक(वय २०), अभिषेक राजू आसाल (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे असून दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चार जणांना न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जवाहरनगर परिसरात शुभम काणे, आदित्य सुतार यांच्यासह ९ जणांनी संतोष जाधव याच्यावर धारधार शस्त्रांनी सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजु बंडगर याच्या फिर्यादीनुसार शुभम काणे, आदित्य सुतार याच्यासह ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली होती. रविवारी रात्री खून प्रकरणातील चार जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या चार जणांना न्यायालयात हजर केले असता १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड आदि अधिकारी इचलकरंजी येथे दाखल होऊन सूचना दिल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.