आजरा. प्रतिनिधी. १८
राष्ट्रीय महामार्ग ५४८ हा रस्ता संकेश्वर ते बांधा पैकी मौजे. भादवणवाडी ते घाटकरवाडी पंर्यतच्या रस्त्याची डागडुजी व्हावी. अशा याचे निवेदन आजरा मनसे यांनी तहसीलदार आजरा यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्ग ५४८ हा रस्ता संकेश्वर ते बांधा असा राष्ट्रीय महामार्ग करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने आजरा तालुक्यामधील मौजे भादवणवाडी ते मौजे घाटकरवाडीवाडी असा रस्ता राष्ट्रीय महामार्ग महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. परंतु आजमितीस सदर रस्ता दुर्लक्षित झालेला असून रस्त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात खड्डे पडलेले आहेत यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही दिवसात ऊसाची वाहतूक सुरू होणार असल्याने सदर वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागणार आहेत. एकीकडे रस्ता अत्यंत ना दिवस असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामध्ये ऊस वाहतूक चालू झाल्यानंतर अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच रस्ता होणार आहे. त्यामुळे सदर रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. वेळोवेळी निवेदने देऊन देखील आपल्या विभागाकडून खड्ड्यांमध्ये फक्त मातीचा वापर करून खड्डे भरून घेतले आहेत. सदर खड्ड्यामध्ये माती ही जास्तीत जास्त चार ते पाच दिवस टिकाव धरून राहते व पुन्हा त्या ठिकाणी खड्डा होऊन जातो सदर माती टाकून खड्डे भरण्याचे कामकाज न करता संबंधित कार्यालयांना आपल्या मार्फत कडून समज देऊन खड्डे हे खडी डांबर त्याचा योग्य वापर करून भरण्यात यावे. यामुळे रस्ते व विकास महामंडळ यांना आपल्या कार्यालयामार्फत संबंधित विभागाला माहिती देऊन रस्ता दुरुस्त करणे बाबत आपण तहसीलदार या नात्याने पुढाकार घ्यावा. व नादुरुस्त रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंटे सचिव चंद्रकांत सांबरेकर, महिला उपाध्यक्ष पुनम भादवणकर, शिवराज लोखंडे, स्वप्नील लोखंडे, शुभम कांबळे, सुशांत लोखंडे सह मनसैनिकांच्या सह्या आहेत.
