आजरा. प्रतिनिधी. १८.
आजरा येथे सरपंच परिषदेचा कार्यक्रम मार्गदर्शन शिबीर गावचा सरपंच हे पद अतिशय महत्वाचे पद आहे .
मनात आणले तर सर्व योजना सरपंचांनी समजून घेतल्या तर गावचा कायापालट होऊ शकतो.म्हणून सरपंचांनी गावचा सारथी म्हणून काम करावे असे प्रतिपादन गारगोटी येथील सरपंच ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रा. विक्रम खोपडे यांनी आजरा येथे बोलताना व्यक्त केले.आजरा तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्याकरिता मार्गदर्शन शिबीर गंगामाई वाचन मंदिर येथे आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.स्वागत देवर्डेचे सरपंच जी. एम. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच परिषदेचे तालुकाअध्यक्ष संतोष बेलवाडे यांनी केले यावेळी त्यांनी तालुक्यातील सरपंचांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला.उपस्थित मार्गदर्शक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला.यावेळी बोलताना खोपडे पुढे म्हणाले.१५वा वित्त आयोग व डी एस सी या नवीन प्रणालीमुळे सरपंचाची जबादारी वाढली आहे.डी.एस. सी.चा वापर ए. टी. एम सारखा होऊ शकतो त्यामुळे सर्वानी ही प्रणाली समजून घ्यावी .सरपंच पदाला जेवढं मूल्य आहे तेवढं मूल्य डी .एस सी ला आहे.ग्रामपंचायतीचे अंदाज पत्रक समजून घेतले पाहिजे.वित्त आयोगातील मार्गदर्शन प्रमाणे निधी खर्च करा. ग्रामसेवक आणि सरपंच ही दोन महत्वाची विकासाची चाके आहेत.कारभार पारदर्शक करा असे आहवान केले.यावेळी दुसरे मार्गदर्शक माणगांव चे सरपंच राजू मगदूम यांनी ग्रा मपंचायत हद्दीतील महावितरण ची करवसुली व शासनाचे कायदे याबाबत मौलिक मार्गदर्शन केले व पुढील काळात यासाठी मोठा लढा उभारणार असे सांगितले.या कार्यक्रमात पत्रकार सुभाष पाटील यांची तालुका प्रसिध्दी प्रमुख म्हणून नियुक्ती करणेत आली. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य राजू पोतनीस ,सचिवअमोल बांबरे, शंकर कुराडे शंकर संकपाळ लता रेडेकर, आकाराम देसाई, यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन सरपंच परिषदेचे संघटक .मारुती मोरे यांनी केले तर आभार महिला तालुका अध्यक्ष मनीषा देसाई यांनी मानले..
