Homeकोंकण - ठाणेशिक्षक संघटनांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने नियुक्तीचा विषय बारगळला.

शिक्षक संघटनांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने नियुक्तीचा विषय बारगळला.

मुंबई. प्रतिनिधी. १८

प्राथमिक शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वर्षाला घेऊन त्यातून मानधन तत्त्वावर गावातील बीएड, डीएड तरुणांना संधी देण्याचा विचार सुरू होता.

विषयावर शिक्षक संघटनांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने नियुक्तीचा विषय बारगळला आहे. याला शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनीही दुजोरा दिला.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये पूर्वीपासून परजिल्ह्यातील लोकांचा भरणा अधिक झाला होता. बराच कालावधी रत्नागिरी जिल्ह्यात काम केल्यामुळे अनेकांनी आपल्या गावाकडे परतण्यास सुरवात केली आहे.

जुने शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या अधिक होत आहे. शासनाकडून नवीन भरतीकडे कानाडोळा करण्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे हजारावर गेली आहेत.

गतवर्षीपासून शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांची प्रक्रियाही थांबविण्यात आली आहे. रिक्त पदांमुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.