आजरा:-प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आजरा बँकेच्या शाखा राधानगरीकडे एटीएम सेवेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता राजाराम भाटले यांच्या हस्ते करण्यात आला. सदरच्या एटीएम मध्ये सर्व बँकांचे एटीएम कार्ड चालणार असून त्यामुळे राधानगरी परिसरातील सर्व ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच बँकेच्या व्हा.चेअरमन श्रीमती शैला टोपले यांनी बँकेमार्फत ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती उपस्थितांना दिली.
सदरच्या कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ.अस्मिता सबनीस, राजाराम भाटले, दत्ता निले, मारुती पालकर तसेच राधानगरी शाखेचे शाखाधिकारी मधुकर कांबळे, तसेच राधानगरी भागातील प्रतिष्ठित नागरीक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
