आजरा. प्रतिनिधी. १५
सभासदांच्या, कामगाराच्या व नेत्याच्या विश्वासाला तडा न जाता दिलेला शब्द पाळणार असल्याची ग्वाही आजरा साखरचा बाॅयलर – अग्नि प्रदीपन समारंभ प्रसंगी चेअरमन. प्रा. सुनिल शित्रे यांनी दिली ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रस्ताविक कार्यकारी संचालक डॉ. टि. ए. भोसले यांनी केले. चेअरमन श्री. शित्रे बोलताना पुढे म्हणाले सर्वांच्या सहकार्याने हा कारखाना सुरू होत आहे यामध्ये कामगार यांचे फार मोठे योगदान आहे. याप्रसंगी जमेल तेवढं बोलत आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार करेन. तरी सर्व ऊस उत्पादकांनी आजरा साखर कारखाना ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्री शिंत्रे. यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.आनंद उर्फ नृसिंग एकनाथ गोसावी यांनी सभासद, व कामगार, संचालक यांना अध्यात्म व लौकिक या विषयावर मार्गदर्शन केले व विजयादशमी निमित्त दोन वर्षे बंद पडलेला कारखाना सुरू होत आहे. आजचा दिवस आजरा कारखान्यासाठी सोन्याचा दिवस आहे. असे म्हणत सर्वांना त्यांनी आशीर्वाद व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
दि. १५ रोजी आजरा येथील सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२, २३ या गळीत हंगामाचा आजरा साखरचा बाॅयलर – अग्नि प्रदीपन, होम-हवन विधी समारंभ संचालक दिगंबर देसाई ,त्याच्या सुविद्य पत्नी शालिनीताई देसाई यांचे शुभहस्ते तर स. १० वा. चेअरमन प्रा. शित्रे यांच्या अध्यक्षतेखाली बाॅयलर अग्नि प्रदीपन डॉ. आनंद उर्फ नृसिंग एकनाथ गोसावी महाराज पिठाधीस प.पु. श्री. हरिकाका गोसावी, ऋग्वेद भागवत मठ जि. बेळगाव, यांच्या व व संचालक मंडळाच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते सूत्रसंचालन व्यंकटेश ज्योती तर आभार व्हा. चेअरमन अनंदराव कुलकर्णी यांनी मानले
