Homeकोंकण - ठाणेउचंगी प्रकल्प ताकदीने मार्गी लावू:- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उचंगी प्रकल्प ताकदीने मार्गी लावू:- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

( आजरा कोळिंद्रे येथे शिवसेनेचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न. )

आजरा: प्रतिनिधी. १४

आजरा- गडहिंग्लज तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणारा उचंगी प्रकल्प हा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने प्रयत्न करू असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. कोळिंद्रे (ता.आजरा) येथे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते . मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर होते .
प्रास्ताविक करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, शेतकरी हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेतले जात आहेत .एकीकडे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शेतकर्यांना चिरडून ठार मानण्यासारखे प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अतिवृष्टीने बाधित शेतकर्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करते हा विरोधाभास निश्चितच जाणवतो अतिशय चांगल्या पध्दतीने राज्य सरकारचे काम सुरू आहे. सर्वसामान्यांना बळ देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडून सुरू आहे .येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकांमध्ये सेनेचा भगवा फडकला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले .
कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर म्हणाले, चांगल्या पध्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सुरू असुन हे काम घरोघरी पोचवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आहे. शिवसेनेचे विचार घरोघरी पोहचल्यास संघटना आणखी मजबूत होण्यास हातभार लागणार आहे. असेही स्पष्ट केले .
गेली दोन वर्षे बंद अवस्थेत असणारा आजरा साखर कारखाना चालू करण्यास मंत्री सामंत यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी, माजी. आम. उत्लास पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील महिला जिल्हा संघटक संज्योती मळवीकर शांता जाधव आजरा साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई ,संदीप उगाडे यांच्यासह युवासेना ग्रामीण जिल्हाधिकारी दिनेश कुंभीरकर, ता.प्रमुख राजेंद्र सावंत, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.आभार उपसरपंच शंकर संकपाळ यांनी मांनले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.