सेनगांव. प्रतिनिधी. १३.
सेनगाव तालुका येथील हजारो “अंध,अपंग,विधवा,परितक्ता,निराधार व्यक्तीना मदत म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याद्वारे तालुक्यातील लाभार्थ्यांना त्यांचा तात्काळ पगार काढावा व नवीन प्रकरणे तात्काळ मंजूर करून मिळावी. यासाठी राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की समाजातील अंध अपंग , निराधार व्यक्तींना मदत शासनातर्फे निराधार इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना वेतन मदत दिली जाते सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणाला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुकास्तरावर एक समिती स्थापन केलेले त्याचे सचिव तहसीलदार असतात परंतु गेल्या अनेक दिवसापासून सदर समिती स्थापन केली नसल्याने अनेक दिवसापासून प्रकरणे रखडलेले आहेत तसेच नवीन प्रकरणांना मंजुरी मिळत नसल्यामुळे सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील लोकांना या योजनां पासून वंचित राहावे लागत आहे नवीन पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत त्यांना तत्काळ लाभ मिळावा यासाठी लवकरात लवकर समिती स्थापन करून नवीन प्रकरणे मंजूर करण्यात यावी यासाठी सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले लाभार्थ्यांच्या प्रकरणाला मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदार यांना असल्यामुळे सदर योजनेच्या मंजुरीसाठी तहसील कार्यालयात प्रकरण केलेले या पात्र लाभार्थी या प्रकरणात त्यांच्या स्तरावर कारवाई करून मंजुरी देण्यात आतापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या योजनांच्या वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यापासून सदर योजनेचे वेतन मिळत नाही ते त्वरित देण्यात यावे या योजनेतील लाभार्थ्यांना अंध अपंग विधवा परितक्ता, निराधार व्यक्ती वर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी यासाठी परमेश्वर इंगोले पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास सेनगाव तालुक्यातील तहसील कार्यालयावर तालुक्यातील अंध अपंग निराधार लोकांचा भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती परमेश्वर इंगोले पाटील यांनी दिली .यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे, देशमुख , राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ओम शिंदे, रवी लांडे ,निलेश घटोलकर ,सत्यम देशमुख ,गजानन वंजारी ,बाबासाहेब देशमुख गव्हाणे गोविंद देशमुख , राजू वाणी, अक्षय देशमुख सह कार्यकर्ते उपस्थित होते
