Homeकोंकण - ठाणेआजरा युवा सेनेचे ग्रामीण रुग्णालयाला निवेदन. - श्वान, सर्प दंश लस ताबडतोड...

आजरा युवा सेनेचे ग्रामीण रुग्णालयाला निवेदन. – श्वान, सर्प दंश लस ताबडतोड उपलब्ध कराव्यात.

आजरा. प्रतिनिधी. १२

आजरा तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात सर्प व श्वान दंश होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने श्वानदंश पासून अधिक लोकांना झाला असल्याचे समजते. परंतु याबाबतच्या देण्यात येणारी लस आजरा ग्रामीण रूग्णालयात कडे उपलब्ध नसल्यास काही व्यक्तींना धोका होऊ नये यासाठी श्वान लस आजरा ग्रामीण रुग्णालय वरिष्ठांना कळवून ताबडतोब उपलब्ध करून घ्यावी व नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नये याबाबतचे निवेदन आजरा युवासेना व शिवसेना यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. या निवेदनावर युवा सेनेचे पदाधिकारी सुधीर सुपल, अश्विन राणे, अक्षय कांबळे, ओमकार माडभगत, अमरदीप कांबळे, अभिजित कुंभार, शैलेश माडभगत, स्वप्निल सुतार, संदेश कांबळे सह युवा अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

{ आजरा तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार – कुत्र्याने चावा घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आजरा तालुक्यात गेल्या ,सहा महिन्यात २६२ नागरिकांना श्वानदंश होऊन ५५४ लसी दिल्या आहेत.
यामध्ये. – एप्रिल. ४९ रुग्ण, लसी ९६, मे. रुग्ण. -४३ लसी. १०६, जुन. रूग्ण ४९. लसी १२३, जुलै. रूग्ण. २६. लसी ८५ , ऑगस्ट .रूग्ण. ४४ लसी १०५, सप्टेंबर .रूग्ण ५१.लसी ९९ तर या सहा महिन्यात २८ सर्पदंश झालेला आहे. }

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.