आजरा. प्रतिनिधी.
आजरा शहरातील होत असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तीन वर्षापासून अपूर्ण का.? याबाबत ग्रामीण भागातील शिवभक्त आक्रमक झाले आहेत.
समितीकडून कामाला गती येत नसेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील तर ग्रामीण भागातील शिवभक्तांना सहभागी करून घ्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवप्रभूंचे स्मारक आम्ही शिवभक्त पूर्ण करतो. असे निवेदन आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी अजिंक्य पाटील व समितीचे अध्यक्ष बापू टोपले यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे. की आम्ही आजरा शहर व तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील शिवभक्त निवेदनाद्वारे नगरपंचायत आजरा प्रशासनाला असे सूचित करतो की आजरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सन २०१८ पासून जीर्णोद्धाराचे काम सुरू केलेले आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले हे काम आज तागायत पूर्णत्वास गेले नाही यामुळे तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पावित्र्य राखत थोर लेखक मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आणि आपल्या छावा कादंबरी मधून धर्मवीर संभाजी महाराजांना न्याय मिळवून दिला त्या शिवाजीराव सावंत यांच्या जन्मभूमीत शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विलंब व्हावा हे खेदजनक आहे. तरी या कामी नगरपंचायत प्रशासन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी आजरा शहर जिर्नोधर समिती यांनी लक्ष घालून सदरचे काम त्वरित पूर्णत्वास न्यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर रणजीत सरदेसाई, मंगेश पोतनीस, युवराज विष्णू जाधव, सलीम लतीफ, शैलेश मुळीक, संतोष हरी चौगुले, सुधीर सुपल, अनिकेत मुळीक, सचिन होंरबळे, रुपेश निर्मळे, सर्जेराव दळवी, एकनाथ कांबळे, संकेत सांगत, राहुल नार्वेकर, निलेश परब, विष्णू सुतार सह आजरा शहर व ग्रामीण भागातील शिवभक्तांच्या या निवेदनावर सही आहेत.
