राधानगरी. प्रतिनिधी.
राज्यात येणाऱ्या काळातील जि. प. व प. स. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राधानगरी येथील शिवसेना पदाधिकारी कामाला लागले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना संपर्क नेते. माजी मंत्री दिवाकर रावते, समन्वयक दगडुदादा सकपाळ, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता राधानगरी विधानसभा संपर्क प्रमुख दिनानाथ चौगुले याच्या प्रमुख उपस्थितीत भुदरगड तालुक्यातील पाटगाव / जिल्हा परिषद मतदार संघातील आडे, तळीवाडी, तांब्याची वाडी, शिवाजी नगर, शिवडव,मठगाव,तांबाळे,आंतुर्ले,पाळ्याहुडा,चाफेवाडी, वेसर्डे, नांदोली,सोनुर्ली, देऊळवाडी, तिरवडे, तसेच.जि.प.पाटगाव वाळवा, सरवडे गणातील येथील
शाखाप्रमुख व माजी पदाधिकारी तसेच पक्ष वाढीच्या कामाचा आढावा घेत आहेत. गावा गावात शहरप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिकांच्या भेटीगाठी दौरा सुरु आहे. या गाठीभेटी दौऱ्यात ता. प्रमुख अविनाश शिंदे, उप.ता.प्रमुख वसंत कांबळे ता.प्रमुख भिकाजी हळदकर, करवीर विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश चौगले, उपतालुकाप्रमुख के. के. राजिगरे सहभागी होते.