आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील चितळे, जेऊर, भावेवाडी ग्रुप ग्रामपंचायत या विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका व एन. एच. एम, सी.ए.एच. प्रक्रिया अंतर्गत संवाद आरोग्य उपकेंद्र चितळे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले होते. प्रस्तावित तालुका समन्वय काशिनाथ मोरे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष चौगुले बोलताना म्हणाले शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवले जात असून त्याचा लाभ आपण घेण्यास कमी पडतो तरी खाजगी डॉक्टर यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसताना विनाकारण पैसा खर्च करत अहात यासाठी आपल्या विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मलिग्रे व उपकेंद्र चितळे या भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने उपचार होत आहेत. यासाठी येथील प्राथमिक केंद्राचा आपण लाभ घ्यावा. चितळे येथे शासनाने ८० लाख रुपये खर्च करून उपकेंद्राचे बांधकाम केले आहे. परंतु अद्याप त्यांना उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा घेऊन या उपकेंद्रांमध्ये नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी हे उपकेंद्र चालू होण्यासाठी विलंब होत आहे. याकडे आजरा आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्यास आजरा मनसे यामध्ये लक्ष घालून ताबडतोड चालू करण्यास शासनाला भाग पाडेल असे बोलताना श्री चौगुले म्हणाले. उप. अध्यक्ष आनंदा घंट्टे बोलताना म्हणाले मौजे चितळे ग्रुप ग्रामपंचायत मधील नागरिकांनी शासनाकडून अवघ्या या ५ रुपयाच्या केस पेपर मध्ये आरोग्य विभाग व येथील प्राथमिक केंद्र, उपकेंद्र आपल्याला सर्व सुविधा देत आहेत. या ठिकाणी तिन्ही गावातील ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी येणाऱ्या काळात अशा वेगवेगळ्या कॅम्प महाराष्ट्र नवनिर्माण सेना लावणार आहे यामध्ये महसूल, पुरवठा विभाग, आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना अशा वेगवेगळ्या कॅम्प लावून वंचित नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनसे यापुढे काम करणार आहे. तरी आपण सर्व व या विभागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सध्या सुरू असलेल्या आरोग्य शिबिरासाठी तिन्ही गावातील नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून घ्याव्या यामध्ये काही लहान – मोठी ऑपरेशन असतील तीदेखील शासनाच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशनकार्डावर शासनाच्या योजनेचे सहकार्य मिळेल व आपला खाजगी डॉक्टरांच्या कडे पैसा वाया जाणार नाही यासाठी अशा शिबिरांना जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेऊन आपल्या आरोग्य चांगले ठेवावे असे बोलताना श्री.घंट्टे म्हणाले. यावेळी मलिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आर. जी. गुरव म्हणाले मलिग्रे येथील केंद्रामध्ये आपण येऊन विविध आरोग्याची तपासणी करून उपचार करून घ्यावे आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत शासनाच्या विविध योजनेचा आपण लाभ घ्यावा वा असे डॉ.श्री गुरव म्हणाले. तसेच संजय सांबरेकर , श्री. मोरे यांनी आरोग्य विषयी नागरिकांना मार्गदर्शन केले व विविध योजनेची माहिती सांगितली.
( यावेळी आरोग्य विभाग स्टाफ, आरोग्य सेविका, मदतनीस, अशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. )
या आरोग्य शिबिरात प्रसंगी मनसे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला जिल्हा उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सविता सावंत, उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई, उप. ता. अध्यक्ष प्रकाश कांबळे, पं. स. संघटक शोभा कांबळे, कासारकाडगांव शाखा अध्यक्ष मंगल मुगुरडेकर, तसेच अर्चना वंजारी, ग्रामसेवक सचिन गुरव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आरोग्य विभागातील स्टॉप उपस्थित होता सूत्रसंचालन व आरोग्य शिबिराचे परिश्रम मनसे सचिव चंद्रकांत सांबरेकर यांनी घेतले.
श्री. मोरे यांनी मानले.