कुडाळ. प्रतिनिधी.
माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर केला प्रवेश.
माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य राजन जाधव, पाट पं स सदस्य सुबोध माधव, वालावल पं स सदस्य प्राजक्ता प्रभू या 3 पं स सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. चिपी विमानतळाच्या उदघाटनाला शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येऊन गेल्यानंतर अवघ्या 24 तासांत निलेश राणे यांनी शिवसेनेला दिलेला हा झटका मानला जात आहे.
कणकवली येथील राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर आज दुपारी हा प्रवेशाचा धमाका करत निलेश राणेंनी शिवसेनेला झटका दिला आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, कुडाळ सभापती नूतन आईर, विशाल परब, आनंद शिरवलकर, सभापती अंकुश जाधव, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्या तवटे आदी उपस्थित होते.